MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगत आहे. क्विंटन डी'कॉक व रोहित शर्मा यांना मोठी खेळी करता आली नसली तरी सूर्यकुमार यादवची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. RRकडून पदार्पण करणाऱ्या कार्तिक त्यागीनं सर्वांचे लक्ष वेधले. श्रेयस गोपाळनं दिलेल्या धक्क्यातून MIला सावरण्यात थोडासा वेळ लागला. पण, हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी मुंबई इंडियन्सची लाज वाचवली. या दोघांनी राजस्थान रॉयल्स ( RR) च्या गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. मुंबईचा धावांचा खाली गेलेला ग्राफ या दोघांनी उंचावला आणि RRसमोर तगडे लक्ष्य उभे केले. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. MIच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी RRने आज तीन बदल केले आहे. जयदेव उनाडकट, रॉबीन उथप्पा आणि रियान पराग यांना संघाबाहेर केले असून यशस्वी जैस्वाल व अंकित राजपूत यांचे कमबॅक झाले आणि 19 वर्षांखालील वर्ल्ड कप संघातील मॅचविनर गोलंदाज कार्तिक त्यागी पदार्पण केले. रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. अंकित राजपूतला टार्गेट करत दोघांनी धावा कुटल्या. राजपूतसाठी आजचा दिवस खास दिसत नव्हता. त्याच्याकडून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर क्विंटनचा झेलही सुटला.
19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाज कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi ) कडे कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) पाचवे षटक टाकण्यासाठी चेंडू दिला. रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MIला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले. फ्रंटसिटवर बसलेल्या मुंबई इंडियन्सना श्रेयस गोपाळनं माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानं एकाच षटकात रोहित शर्मा (35) व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या 15 षटकांत 4 बाद 124 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादवनं 34 चेडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केलं.
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि यादवनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. हार्दिकला 18व्या षटकात कुरनकडून जीवदान मिळालं. 19व्या षटकात जोफ्रा आर्चरनं 152 kphच्या वेगानं टाकलेल्या बिमरनं हार्दिकचं डोकंच फुटले असते, पण वेळेत तो खाली बसला आणि चेंडू यष्टिरक्षकालाही अडवता न आल्यानं सीमापार गेला. सूर्यकुमार आणि हार्दिकनं अखेरच्या पाच षटकांत 12च्या सरासरीनं धावा चोपून मुंबई इंडियन्सला मोठा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमारने 47 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या, हार्दिक 30 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 193 धावांचा पल्ला गाठून दिला.
मुंबई इंडियन्सची ही खेळी विक्रमी ठरली. IPLमध्ये सलग पाच सामन्यांत 190+ धावा करणारा हा पहिलाच संघ ठरला.
IPL 2020त मुंबई इंडियन्सनं हा पराक्रम करून दाखवला.
MI ची IPL 2020मधील मागील चार सामन्यांतील धावसंख्या5/208 वि. सनरायजर्स हैदराबाद
4/191 वि. किंग्स इलेव्हन पंजाब
5/201 वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
5/195 वि. कोलकाता नाइट रायडर्स
सलग 190+ धावा करणारे संघ
मुंबई इंडियन्स - 5 सामने ( 2020)
चेन्नई सुपर किंग्स - 3 ( 2018)
दिल्ली कॅपिटल्स - 3 ( 2018)
गुजरात लायन्स - 3 ( 2017)
किंग्स इलेव्हन पंजाब - 3 ( 2014)
Web Title: MI vs RR Latest News : MI becomes the only team to score five consecutive 190+ scores in IPL history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.