Join us  

MI vs RR Latest News : रोहित शर्मानं मोडला सुरेश रैनाचा 'मोठा' विक्रम; आता लक्ष्य MS Dhoni!

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: October 06, 2020 7:21 PM

Open in App

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचपैकी 3 सामन्यांत विजय मिळवले आहेत आणि आज विजय मिळवून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत आणि विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी रोहित अँड टीम सज्ज आहे. पण, मुंबई इंडियन्सनं 2015मध्ये राजस्थान रॉयल्सवर अखेरचा विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या चार सामन्यांत RRनं बाजी मारली आहे. 

रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. MIच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी RRने आज तीन बदल केले आहे. जयदेव उनाडकट, रॉबीन उथप्पा आणि रियान पराग यांना संघाबाहेर केले असून यशस्वी जैस्वाल व अंकित राजपूत यांचे कमबॅक झाले आणि कार्तिक त्यागी पदार्पण करणार आहे. 

मुंबई इंडियन्स XI - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

राजस्थान रॉयल्स XI - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोम्रोर, राहुल टेवाटिया, टॉम कुरन, जोफ्रा आर्चर, गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी 

रोहित शर्मा ( Rohit Sharma) चा विक्रमया सामन्यात रोहित शर्माने IPLमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रमात सुरेश रैनाला मागे टाकले आहे. रोहितचा हा 194 सामना आहे. चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी या विक्रमात 195 सामन्यांसह आघाडीवर आहे. रोहितनं 193 सामन्यांत 5074 धावा केल्या आहेत. IPLमध्ये 5000 धावा करणारा तो विराट व रैनानंतर तिसरा खेळाडू आहे. यंदाच्या पर्वात रोहितनं 5 सामन्यांत 176 धावा केल्या आहेत. त्यात 80 व 70 धावांच्या खेळीचा समावेश आहे.

एका विक्रमाला गवसणी घातली. रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केली आहे आणि आज त्यानं अर्धशतक केल्यात तो सुरेश रैनाचा IPLमधील सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडणार आहे. या दोघांच्या नावावर प्रत्येकी 38 अर्धशतकं आहेत आणि आज रोहितची बॅट तळपल्यास तो IPLमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा भारतीय खेळाडू बनेल. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर 131 सामन्यांत 45 अर्धशतकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर रोहितचाच क्रमांक येतो. 

टॅग्स :IPL 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्ससुरेश रैनामहेंद्रसिंग धोनीराजस्थान रॉयल्स