MI vs RR : मुंबई इंडियन्सची विजयी हॅटट्रिक, राजस्थान रॉयल्सची शरणागती

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना एकतर्फी झाला.

By स्वदेश घाणेकर | Published: October 6, 2020 06:05 PM2020-10-06T18:05:49+5:302020-10-06T23:33:23+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR Live Score Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2020 Live Score and Match updates | MI vs RR : मुंबई इंडियन्सची विजयी हॅटट्रिक, राजस्थान रॉयल्सची शरणागती

MI vs RR : मुंबई इंडियन्सची विजयी हॅटट्रिक, राजस्थान रॉयल्सची शरणागती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RR Latest News & Live Score :  हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी मुंबई इंडियन्सची लाज वाचवली. या दोघांनी राजस्थान रॉयल्स ( RR) च्या गोलंदाजांना पळो की सळो करून सोडलं. मुंबईचा धावांचा खाली गेलेला ग्राफ या दोघांनी उंचावला आणि RRसमोर तगडे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात जोस बटलर ( Jos Buttler) वगळता राजस्थानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. मुंबई इंडियन्सनं हा सामना सहज जिंकून Point Table मध्ये अव्वल स्थान पटकावले. 2015नंतर मुंबईने IPLमध्ये राजस्थानला पराभूत केले. 

MI vs RR Latest News & Live Score

14व्या षटकात जेम्स पॅटिसन्सने RRच्या उरलेल्या विजयाच्या आशाही मावळून टाकल्या. जोस बटलर 44 चेंडूंत 4 चौकार व 5 षटकारांसह 70 धावा करून माघारी परतला. किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) सीमारेषेवर त्याचा झेल टिपला. पण, हा झेल टिपताना पोलार्डची चांगलीच कसरत झाली. पुढील 38 धावांत RRचे उर्वरित फलंदाज तंबूत गेले. राजस्थानचा संपूर्ण संघ 18.1 षटकांत 136 धावांत माघारी गेला. जसप्रीत बुमराहनं ( 4/20) सर्वाधिक विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट व जेम्स पॅटिन्सन यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मुंबई इंडियन्सनं हा सामना 57 धावांनी जिंकला. 

प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल ( 0), कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 6) आणि संजू सॅमसन ( 0) हे 12 धावांत माघारी परतले. ट्रेंट बोल्टने दोन, तर जसप्रीत बुमराहनं 1 विकेट घेतली. जोस बटलर ( Jos Buttler ) आणि महिपाल लोम्रोर ( Mahipal Lomror) यांनी 30 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल चहरनं ( Rahul Chahar) राजस्थान रॉयल्सचा मोठा धक्का दिला. चहरच्या गोलंदाजीवर लोम्रोरनं मारलेला फटका उत्तुंग उडाला आणि बदली खेळाडू म्हणून आलेल्या अनुकूल रॉयनं उलट्या दिशेनं धाव घेत हवेत झेपावत IPL 2020मधील अविश्वसनीय झेल घेतला. 

सूर्यकुमार आणि हार्दिकनं अखेरच्या पाच षटकांत 12च्या सरासरीनं धावा चोपून मुंबई इंडियन्सला मोठा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमारने 47 चेंडूंत 11 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या, हार्दिक 30 धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला 4 बाद 193 धावांचा पल्ला गाठून दिला. 

फ्रंटसिटवर बसलेल्या मुंबई इंडियन्सना श्रेयस गोपाळनं माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानं एकाच षटकात रोहित शर्मा (35)  व इशान किशन ( 0) यांना सलग चेंडूंवर बाद केले. त्यानंतर हार्दिक पांड्या किंवा किरॉन पोलार्ड येणं अपेक्षित होतं, परंतु कृणाल पांड्याला आघाडीवर पाठवले. पण, कृणाल 12 धावा करून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मुंबई इंडियन्सच्या 15 षटकांत 4 बाद 124 धावा झाल्या होत्या. सूर्यकुमार यादवनं 34 चेडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केलं. 

श्रेयस गोपाळनं एकाच षटकात MIला सलग दोन धक्के दिले. त्यानं रोहित शर्मा ( 35) आणि इशान किशन ( 0) यांना माघारी पाठवले. 

19 वर्षांखालील वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाज कार्तिक त्यागी ( Kartik Tyagi ) कडे कर्णधार स्टीव्ह स्मिथनं ( Steve Smith) पाचवे षटक टाकण्यासाठी चेंडू दिला. रोहित शर्मानं खणखणीत षटकार खेचून त्याचे स्वागत केले. पण, त्याच षटकात कार्तिकनं MIला धक्का दिला. क्विंटन डी'कॉकला ( 23) अप्रतिम बाऊंसर टाकून त्यानं झेलबाद करून माघारी पाठवले. 

रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Quinton de Kock) यांनी स्फोटक सुरुवात केली. अंकित राजपूतला टार्गेट करत दोघांनी धावा कुटल्या. राजपूतसाठी आजचा दिवस खास दिसत नव्हता. त्याच्याकडून जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर क्विंटनचा झेलही सुटला. 
 

रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. MIच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नसला तरी RRने आज तीन बदल केले आहे. जयदेव उनाडकट, रॉबीन उथप्पा आणि रियान पराग यांना संघाबाहेर केले असून यशस्वी जैस्वाल व अंकित राजपूत यांचे कमबॅक झाले आणि कार्तिक त्यागी पदार्पण करणार आहे. 

  • मुंबई इंडियन्स XI - रोहित शर्मा, क्विंटन डी'कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
  • राजस्थान रॉयल्स XI - जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन, महिपाल लोम्रोर, राहुल टेवाटिया, टॉम कुरन, जोफ्रा आर्चर, गोपाळ, अंकित राजपूत, कार्तिक त्यागी 

कार्तिक त्यागी - 2017मध्ये राज्याच्या वरिष्ठ संघात पदार्पण करून या खेळाडूनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. युवा वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं आपल्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केले. राजस्थान रॉयल्सनं त्याच्यासाठी 1.3 कोटी रुपये मोजलेत. कार्तिक त्यागी आज पदार्पण करत आहे.

- IPL मध्ये मुंबई इंडियन्सकडून 4000 धावांचा पल्ला पार करण्यासाठी रोहित शर्माला 86 धावांची गरज
- सूर्यकुमार यादवनं 2 षटकार खेचल्यास IPLमध्ये षटकारांचे अर्धशतक करणार पूर्ण
-  IPLमध्ये 1500 धावा पूर्ण करण्यासाठी जोस बटलरला 67 धावांची गरज, तर 94 धावा करताच राजस्थान रॉयल्सकडून करणार 1000 धावा पूर्ण
- संजू सॅमसनला 3 झेल व 120 धावा अनुक्रमे IPL मध्ये 50 झेल व 2500 धावा पूर्ण करण्यासाठी हवे आहेत. 

आम्ही मुंबईकर

वेदर रिपोर्ट-
दिवसाचे तापमान ३७ डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५२ टक्के तर हवेचा वेग १९ किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता.

पीच रिपोर्ट-
तीन सामने प्रथम फलंदाजी करणाºया तर तीन सामने लक्ष्याचा पाठलाग करणाºया संघांनी जिंकले. खेळपट्टीवर वेगवान व फिरकी गोलंदाज यशस्वी ठरले आहेत.

मजबूत बाजू
मुंबई गेल्या दोन सामन्यांत शानदार कामगिरी. कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये. डिकॉकला सूर गवसला. पोलार्ड, ईशान किशन, हार्दिक पांड्या हे मॅचविनर संघात.
राजस्थान कर्णधार स्टीव्ह स्मिथचे कुशल नेतृत्व. संजू सॅमसन व राहुल तेवतियासारख्या फलंदाजांची उपस्थिती. यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता.



कमजोर बाजू
मुंबई मुंबई इंडियन्सने जास्तीत जास्त सामने प्रथम फलंदाजी करीत जिंकले आहेत. आरसीबीविरुद्धच्या लढतीत मुंबईला सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. लक्ष्याचा पाठलाग करताना अपयशी ठरण्याची शक्यता. राजस्थान अष्टपैलू बेन स्टोक्सची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. मधल्या फळीचा कामगिरीत सातत्याचा अभाव.

Web Title: MI vs RR Live Score Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2020 Live Score and Match updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.