राजस्थानच्या विजयानं चेन्नई सुपर किंग्सवर IPL इतिहासात प्रथमच ओढावली नामुष्की, कसं ते घ्या जाणून

आतापर्यंत MIचे गोलंदाज हे यंदाच्या Indian Premier League ( IPL 2020) सर्वात तगडे मानले जात होते, परंतु आज त्यांना RRच्या या दोन फलंदाजांनी जमिनीवर आणले.

By स्वदेश घाणेकर | Published: October 25, 2020 11:27 PM2020-10-25T23:27:18+5:302020-10-25T23:29:16+5:30

whatsapp join usJoin us
MI vs RR : Rajasthan Royals' victory also means that CSK will NOT qualify for the IPL playoffs for the first time ever  | राजस्थानच्या विजयानं चेन्नई सुपर किंग्सवर IPL इतिहासात प्रथमच ओढावली नामुष्की, कसं ते घ्या जाणून

राजस्थानच्या विजयानं चेन्नई सुपर किंग्सवर IPL इतिहासात प्रथमच ओढावली नामुष्की, कसं ते घ्या जाणून

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs RR Latest News :  १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा ( Rajasthan Royals) संघ बलाढ्य मुंबई इंडियन्ससमोर ( Mumbai Indians) गुडघे टेकेल असाच सर्वांचा अंदाज होता. पण, निराशाजनक सुरुवातीनंतरही बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन यांनी तुफान फटकेबाजी करून RRला विजयाच्या उंबरठ्यावर आणले.राजस्थान रॉयल्सनं हा सामना ८ विकेट राखून जिंकला. बेन स्टोक्सनं शतकी खेळी केली. राजस्थानच्या या विजयानं त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले, परंतु चेन्नई सुपर किंग्सवर ( Chennai Super Kings) आयपीएलच्या इतिहासात प्रथमच नामुष्की ओढावली. 

फॉर्मात असलेला क्विंटन डी'कॉक ( ६) पहिल्याच षटकात माघारी परतला. इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांची ८३ धावांची भागीदारी कार्तिक त्यागीनं संपुष्टात आणली. इशान किशन ३७ धावांवर माघारी परतला. हार्दिक पांड्या व सौरभ तिवारी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना धु धु धुतले. त्यांनी ३१ चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. कार्तिक त्यागीनं टाकलेल्या २०व्या षटकात हार्दिकनं २७ धावा कुटल्या. हार्दिक २१ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६० धावांवर नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सनं ५ बाद १९५ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं अखेरच्या पाच षटकांत १ विकेटच्या मोबदल्यात ७९ धावा केल्या. यंदाच्या मोसमातील हे तिसरे जलद अर्धशतक आहे.

प्रत्युत्तरात रॉबिन उथप्पा ( १३) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. कर्णधार स्टीव्हन स्मिथ ( ११)चा जेम्स पॅटिन्सननं त्रिफळा उडवला. बेन स्टोक्सनं एका बाजूनं फटकेबाजी करताना राजस्थानच्या आशा कायम राखल्या होत्या. स्टोक्सनं २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. संजू सॅमसननं त्याला तोलामोलाची साथ दिली. दोघांनी ६३ चेंडूंत शतकी भागीदारी करताना धावा व चेंडू यांतील अंतर कमी केलं. या दोघांसमोर मुंबई इंडियन्सचे गोलंदाज अपयशी ठरताना दिसत होते. संजू सॅमसननं २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. स्टोक्स-सॅमसननं नाबाद १५२ धावांची भागीदारी करून राजस्थानला १८.२ षटकांत २ बाद १९६ धावा करून विजय मिळवून दिला. स्टोक्सन ६० चेंडूंत १४ चौकार व ३ षटकारांसह १०७ धावांवर, तर सॅमसन ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५४ धावांवर नाबाद राहिला. 


राजस्थानच्या या विजयानं चेन्नई सुपर किंग्सला Play Offच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर फेकले आहे. RRनं १२ सामन्यांत ५ विजयासह १० गुणांची कमाई केली आहे. चेन्नईनं तितक्याच सामन्यात ८ गुण कमावले आहेत आणि आता त्यांना काही केल्यास प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता येणार नाही. चेन्नईनं आयपीएलच्या १० मोसमात प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. त्यापैकी २०१०, २०११ व २०१८ मध्ये तर त्यांनी जेतेपदाचा चषक उंचावला. २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अशा यशस्वी संघाला २०२०मध्ये प्ले ऑफमध्ये प्रवेश करता न येणं, हे धक्कादायक आहे. 

Web Title: MI vs RR : Rajasthan Royals' victory also means that CSK will NOT qualify for the IPL playoffs for the first time ever 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.