MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 07:32 PM2018-04-24T19:32:40+5:302018-04-24T23:59:01+5:30

whatsapp join usJoin us
MI vs SAH, IPL 2018 LIVE: Mumbai took bowl to win toss | MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

MI vs SH, IPL 2018 :सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे मुंबईसाठी हा सहाव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलने यावेळी तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सचिनला वाढदिवसाची विजयी भेट देण्यात मुंबई अपयशी; हैदराबादचा 31 धावांनी विजय

मुंबई : आपल्या संघाचा मुख्य मार्गदर्शक असलेल्या सचिन तेंडुलकरला वाढदिवशी विजयी भेट देण्यात मुंबई इंडियन्सचा संघ अपयशी ठरला. सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. मुंबईसाठी हा सहाव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलने यावेळी तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

11.45 PM :  मुंबईचा लाजीरवाणा पराभव

11.38 PM : मुंबईला हादरा; हार्दिक पंड्या बाद

11.35 PM : रशिन खानचे निर्धाव षटक

- अटीतटीची लढत सुरु असताना रशिद खानने सतराव्या षटकात एकही धाव दिली नाही. रशिदने हार्दिकला सहा चेंडूंमध्ये एकही धाव दिली नाही.

11.30 PM ; मुंबईला आठवा धक्का; मयांक मार्कंडे बाद

- सिद्धार्थ कौलने आपल्या सोळाव्या षटकाच मॅक्लेघननंतर मयांकला बाद करत मुंबईला दुहेरी धक्के दिले.

11.25 PM : मुंबईला सातवा धक्का; मिचेल मॅक्लेघन बाद

- वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलने मॅक्लेघनला पायचीत पकडत मुंबईला सातवा धक्का दिला.

11.21 PM : मुंबईला सहावा धक्का; सूर्यकुमार यादव बाद

- मुंबईचा डाव सावरणाऱ्या सूर्यकुमार यादवला बसिल थम्पीने बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. सूर्यकुमारने 38 चेंडूंत चार चौकारांच्या जोरावर 34 धावा केल्या.

11.12 PM : मुंबई 14 षटकांत 5 बाद 75

11.10 PM : कायरन पोलार्डचा OUT; मुंबईला पाचवा धक्का

- रशिद खानने पोलार्डला धवनकरवी बाद करत मुंबईला पाचवा धक्का दिला.

11.04 PM : कायरन पोलार्डचा दमदार षटकार

- पोलार्डने तेराव्या षटकात षटकार खेचत आपल्या खेळीची झोकात सुरुवात केली.

11.00 PM : मुंबईला चौथा धक्का; कृणाल पंड्या बाद

- रशिद खानने कृणाल पंड्याला पायचीत पकडत मुंबईला चौथा धक्का दिला.

10.47 PM : मुंबईचे दहाव्या षटकात अर्धशतक पूर्ण

- सूर्यकुमार यादव आणि कृणाल पांड्या यांनी मुंबईचा डाव सावरला. त्यामुळे मुंबईला दहाव्या षटकात अर्धशतक पूर्ण करता आले.

10.25 PM : मुंबईला हादरा; रोहित शर्मा बाद

- शकिब अल हसनने रोहित शर्माला शिखर धवनकरवी झेलबाद केले आणि मुंबईला मोठा धक्का दिला.

10.17 PM  : मुंबईला दुसरा धक्का; इशान किशन बाद

- मोहम्मद नबीने इशान किशनला शून्यावर बाद केले; मुंबईसाठी हा दुसरा धक्का होता.

10.08 PM : संदीप शर्माने इव्हिन लुईसला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला.

मुंबईचा भेदक मारा; हैदराबादचे 118 धावांवर समाधान

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत सनरायझर्स हैदराबादला 118 धावांवर रोखले. मुंबईच्या मयांक मार्कंडेने यावेळी दोन बळी मिळवत पर्पल कॅप पटकावली. मुंबईकडून मयांकसह मिचेल मॅक्लेघन आणि हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले.

मुंबईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण हैदराबादच्या फलंदाजांना यावेळी लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. हैदराबादच्या युसूफ पठाणने अखेरपर्यंत किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला संघाला मोठी धावसंख्या उभारून देता आली नाही. युसूफने 33 चेंडूंत 29 धावा केल्या.

9.35 PM : हैदराबाद 17 षटकांत 9 बाद 109

9.25 PM : हैदराबादला आठवा धक्का; बासिल थम्पी बाद

- मुंबईचा युवा फिरकीपटू मयांक मार्कंडे याने बासिल थम्पीला बाद करत हैदराबादला आठवा धक्का दिला.

9.21 PM : हैदराबाद 15 षटकांत 7 बाद 106

9.12 PM : हैदराबादला सातवा धक्का; रशिद खान बाद

- मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने रशिद खनला बाद करत हैदराबादला सातवा धक्का दिला.

9.04 PM : मयांक मार्कंडे याने पटकावली पर्पल कॅप

- मयांक मार्कंडे याने नबीला त्रिफळाचीत करत आयपीएलमधला नववा बळी मिळवला आणि कोलकात्याच्या सुीनील नरिनकडून पर्पल कॅप हिरावून घेतली.

9.03 PM :  हैदराबादला सहावा धक्का; मोहम्मद नबी बाद

- मुंबईचा युवा फिरकीपटू मयांक मार्कंडे याने नबीला त्रिफळाचीत करत हैदराबादला सहावा धक्का दिला.

9.00 PM : हैदराबाद दहा षटकांत 5 बाद 82

8.50 PM :  हैदराबादला मोठा धक्का; कर्णधार विल्यम्सन OUT

- हार्दिक पंड्याने हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. विल्यम्सनने 21 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 29 धावा केल्या.

8.38 PM :  हैदराबादचे सहाव्या षटकानंतर अर्धशतक पूर्ण

8.30 PM : हैदराबाद पाच षटकांत 3 बाद 45

- सहाव्या षटकात शकिब अल हसनने धावचीत होत अतामघात केला. शकिबला यावेळी सूर्यकुमार यादवने धावचीत केले.

8.28 PM : मनीष पांडे बाद; हैदराबादला तिसरा धक्का

- हार्दिक पंड्याने पाचव्या षटकात मनीष पांडेला रोहित शर्माकरवी झेल बाद केले. हैदराबादसाठी हा तिसरा धक्का होता.

8.12 PM : वृद्धिमान साहा बाद; हैदराबादला दुसरा धक्का

- मॅक्लेघनने दुसऱ्याच षटकातच वृद्धिमान साहाला बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. साहाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.

8.10 PM : हैदराबादला हादरा; शिखर धवन OUT

- मिचेन मॅक्लेघनने दुसऱ्या षटकार शिखर धवनला त्रिफळाचीत करत हैदराबादला मोठा धक्का दिला.

8.01 PM : केन विल्यम्सनचे सलग दोन चौकार

 

सचिन तेंडुलकरला वानखेडेवर वाढदिवसाच्या शुभेच्छा



7.30 PM : मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली

घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सची अग्निपरीक्षा

मुंबई : ज्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने विजयाचा श्रीगणेशा केला होता, त्याच घरच्या मैदानात आता मुंबईची अग्निपरीक्षा असेल. कारण आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये त्यांना फक्त एकच सामना जिंकता आलेला आहे. मंगळवारी त्यांची गाठ पडणार आहे ती सनरायझर्स हैदराबादच्या संघाशी. आतापर्यंत दोन्ही संघांच्या कामगिरीची विचार केला तर हैदराबादने मुंबईपेक्षा चांगली कामिगरी केली आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात मुंबई हैदराबादला धूळ चारते का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. संघाला विजयी करण्यासाठी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा तुफानी खेळी साकारणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार या सामन्यात खेळणार नसल्यामुळे हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

दोन्ही संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंदी हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन.

Web Title: MI vs SAH, IPL 2018 LIVE: Mumbai took bowl to win toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.