Join us  

MI vs SH, IPL 2018 LIVE : थरारक लढतीत हैदराबादचा मुंबईवर विजय

या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवतो की हैदराबादचा संघ विजयाची मालिका कायम राखतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 7:44 PM

Open in App

11.44 PM : थरारक लढतीत हैदराबादचा मुंबईवर विजय11.42 PM : हैदराबादला विजयासाठी एका चेंडूत एक धावेची गरज

11.41 PM : हैदराबादला विजयासाठी 2 चेंडूत 2 धावांची गरज

11.36 PM : दीपक हुडाचा पहिल्या चेंडूवर दमदार षटकार

11.34 PM : हैदराबादला नववा धक्का; विजयासाठी एका षटकात 11 धावांची गरज

11.30 PM: हैदराबादचा आठवा फलंदाज बाद

11.27 PM : रशिद खान शून्यावर बाद; हैदराबादला सातवा धक्का

11.26 PM : युसूफ पठाण OUT; हैदराबादला सहावा धक्का

11.20PM :  हैदराबादला विजयासाठी 18 चेंडूंत 15 धावांची गरज

10.55 PM : मयांकचा बळीचौकार; शकिब अल हसनला केले बाद

10.53 PM : 12 षटकांनंतर हैदराबाद 4 बाद 104

10.48 PM : मयांक मार्कंडेचा तिखट मारा, हैदराबादच्या तिसऱ्या फलंदाजाला केले बाद

- मुंबईचा फिरकीपटू मयांक मार्कंडेने अचूक मारा करत हैदराबादच्या तिसऱ्या फलंदाजाला बाद केले. त्यावेळी हैदराबादची 4 बाद 89 अशी स्थिती होती.

10.41 PM : हैदराबादला मोठा धक्का; सलामीवीर शिखर धवन OUT

- फॉर्मात असलेल्या शिखर धवनला बाद करत मुंबईने हैदराबादला मोठा धक्का दिला. धवनने 28 चेंडूंत 45 धावांची तडफदार खेळी साकारली. मयांक मार्कंडेच्या गोलंदाजीवर जसप्रीत बुमराने धवनचा झेल टिपला.

10.40 : कर्णधार केन विल्यम्सन बाद

- मुंबईचा युवा वेगवान गोलंदाज मिस्ताफिझूर रेहमानने विल्यम्सनला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले.

10.29 PM : हैदराबादला पहिला धक्का, साहा बाद

- मुंबईचा फिरकीपटू मयांक मार्कंडेने भेदक मारा करत साहाला तंबूचा रस्ता दाखवला. साहाला यावेळी दोनदा जीवदान मिळाले होते, पण त्याला 22 धावाच करता आल्या.

10.18 PM : हैदराबादची संयत सुरुवात; पाच षटकांमध्ये बिनबाद 42 धावा

- शिखर धवन आणि वृद्धिमान साहा यांनी संघाला संयत सुरुवात करून दिली.

10.05 PM : हैदराबादच्या वृद्धिमान साहाला जीवदान

- तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर साहाला प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर जडीवदान मिळाले, साहा त्यावेळी चार धावांवर होता.

9.40 PM :  मुंबईच्या फलंदाजांचा ' फ्लॉप शो'; हैदराबादपुढे 148 धावांचे आव्हान

- आयपीएलच्या सलग दुसऱ्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची सुमार कामिगरी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामिगरी करता आली नाही. त्यांची पुरती नाचक्की झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 147 धावांवरच समाधान मानावे लागले. 

9.37 : हैदराबादच्या संदीप शर्माची हॅट्ट्रिक हुकली

- सूर्यकुमार आणि प्रदीप सांगवान यांना सलग चेंडूवर बाद करत हैदराबादचा संदीप शर्मा हॅट्ट्रिकच्या उबंरठ्यावर होता. पण त्याची हॅट्ट्रिक मात्र यावेळी हुकली.

9.35 PM : शंभरावा सामना खेळणारा सूर्यकुमार OUT

- आयपीएलमधला शंभरावा सामना खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. सूर्यकुमारने 31 चेंडूंत 28 धावा केल्या.

9.26 PM : मुंबईला सहावा धक्का, बेन कटिंग बाद

- हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने अठराव्या षटकात बेन कटिंगला त्रिफळाचीत करत मुंबईला सहावा धक्का दिला.

9.13 PM :  मुंबई 15 षटकांत 5 बाद 111

- पंधरा षटकांमध्ये मुंबईची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यांनी पोलार्डसारखा महत्वाचा फलंदाजही गमावला होता. पंधरा षटकांमध्ये त्यांची 5 बाद 111 अशी स्थिती होती.

9.11 PM :  कायरन पोलार्ड OUT, मुंबईला पाचवा धक्का

- दोन षटकांमध्ये दोन षटकार लगावत पोलार्ड एेन भरात आला होता. पण पंधराच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने चुकीचा फटका खेळला आणि त्याला तंबूची वाट धरावी लागली. पोलार्डने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 28 धावा केल्या.

9.07 PM :  कायरन पोलार्डचा दमदार षटकार

- शकिब अल हसनच्या चौदाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पोलार्डने दमदार षटकार लगावला.

8.53 PM : दहा षटकांमध्ये मुंबई 4 बाद 78

- मुंबईसाठी सामन्याची पहिली दहा षटके फारशी चांगली गेली नाही. हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबईच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले होते. त्यामुळे दहा षटकांत मुंबईची 4 बाद 78 अशी स्थिती होती.

8.45 PM : कृणाल पंड्या बाद; मुंबईला चौथा धक्का

- शकिब अल हसनने आपल्या पहिल्याच षटकात कृणाल पंड्याला 15 धावांवर बाद केले.

8.32 PM : सलामीवीर इव्हिन लुईस बाद; मुंबईला तिसरा धक्का

-स्थिरस्थावर झालेला मुंबईचा सलामीवीर लुईस 29 धावांवर बाद झाला. सिद्धार्थ कौलने लुईसला त्रिफळाचीत केले.

8.30 PM : मुंबईला दुसरा धक्का: इशान किशन OUT

- रोहित शर्मानंतर मुंबईच्या इशान किशनलाही जीवादानाचा फायदा उचलता आला नाही. आठ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले होते, त्यानंतर त्याला फक्त एक धाव करता आली आणि 9 धावांवर तो बाद झाला.

8.29 PM : पाच षटकांत मुंबई 1 बाद 48

8.28 PM : इशान किशनला आठ धावांवर असताना जीवदान

- पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर इशानला जीवदान मिळाले. रशिद खानच्या गोलंदाजीवर संदीप शर्माने झेल सोडला.

8.16 PM : इशान किशनचे सलग दोन चौकार

- इशान किशनने तिसऱ्या षटकात सलग दोन चौकार लगावत झोकात सुरुवात केली.

8.13 PM : इव्हिन लुईसकडून मुंबईचा पहिला षटकार

- मुंबईचा सलामावीर लुईसने तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संघासाठी पहिला षटकार लगावला.

8.11 PM :  मुंबईला धक्का; रोहित शर्मा OUT

- रोहित शर्माला शून्यावर मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. दुसऱ्या षटकात तो 11 धावांवर बाद झाला.

8.09 PM : मुंबई इंडियन्सचा पहिला चौकार

- मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर संघासाठी पहिला चौकार लगावला.

8.05 PM : रोहित शर्माला शून्यावर जीवदान

- हैदराबादच्या संदीप शर्माच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपक हुडाने रोहितचा झेल सोडला.

7.43 PM :  हार्दिक पंड्याला दुसऱ्या सामन्यासाठी वगळले

- दुसऱ्या सामन्यासाठी मुंबईच्या संघाने अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला वगळले आहे, त्याच्याजागी संघात बेन कटिंगला स्थान देण्यात आले आहे.

19.40 PM : हैदराबादने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

- हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.

पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स प्रयत्नशील ; सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामनाहैदरबाद : सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्यांचा संघ या आयपीएलच्या हंगामातील विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असेल.मुंबईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे शिखर धवनच्या झंझावाती फलंदाजीमुळे हैदराबादने पहिला सामना जिंकला होता. त्यामुळे या सामन्यात मुंबईचा संघ पहिला विजय मिळवतो की हैदराबादचा संघ विजयाची मालिका कायम राखतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

 

दोन्ही संघ

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.

सनरायझर्स हैदराबाद : केन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंदी हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन.

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबाद