Join us  

पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा

Wasim Akram Mia Khalifa photo : वसीम अक्रमचा मिया खलीफासोबतचा फोटो व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 4:33 PM

Open in App

Wasim Akram With Mia Khalifa : पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रम त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर रोखठोक मत मांडणारा अक्रम आता भलत्याच कारणाने चर्चेत आला आहे. अक्रमचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावरुन त्याची खिल्ली उडवली जात आहे. खरे तर पॉर्न स्टार मिया खलीफासोबत अक्रम दिसल्याने चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि समालोचक अक्रम मिया खलिफासोबत एका सट्टाबाजार चालवणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत दिसला. (Wasim Akram Mia Khalifa shooting together betting app)  

दरम्यान, वसीम अक्रमने एका बेटिंग ॲपसोबत करार केला आहे आणि त्यांच्या एका पोस्टरमध्ये तो दिसत आहे. माहितीनुसार, इंग्लंडचा माजी क्रिकेटर केव्हिन पीटरसनने देखील या बेटिंग ॲपसोबत करार केला आहे. पाकिस्तानमध्ये बेटिंग ॲप्सच्या जाहिरातीवर पूर्णपणे बंदी आहे. पण, असे असतानाही वसीम अक्रम या कंपन्यांशी संबंधित जोडला आहे. साहजिकच याचे मुख्य कारण म्हणजे पैसा. वसीम अक्रम पाकिस्तानात राहत नाही. तो आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात राहतो. 

वसीम अक्रमचा मिया खलिफासोबतचा पोस्टर चर्चेत आहे. याचाच दाखला देत चाहते त्याची फिरकी घेत आहेत. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून माजी खेळाडूला लक्ष्य केले. मागील वर्षी पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच या खेळांचे थेट प्रक्षेपण आणि अशा जाहिराती न दाखवण्यास सांगितले होते. मंत्रालयाने सर्व संबंधित विभाग, मीडिया हाऊस आणि कंपन्यांना त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा करार करू नये, असा इशारा दिला होता. बेटिंग ॲपशी अक्रमचे संबंध नियमांच्या विरोधात मानले जात आहेत.

टॅग्स :वसीम अक्रमऑफ द फिल्डपाकिस्तान