वन डे विश्वचषकाला आजपासून सुरूवात झाली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्या संघाबाबत अनेक भाकीतं वर्तवली जात असून आता इंग्लंडचा माजी खेळाडू मायकेल अथर्टननेही आगामी सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अथर्टनच्या मते विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानी संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी होईल.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. मागील एका दशकापासून या दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत आणि म्हणूनच चाहते त्यांच्या सामन्यांची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला आनंद साजरा करण्याची कधीच संधी दिली नाही आणि आतापर्यंतचे सर्व सात सामने जिंकले आहेत.
इंग्लंडच्या दिग्गजाचा दावास्काय स्पोर्ट्सवर भारत आणि पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना इंग्लिश दिग्गजाने म्हटले, "माझ्या मते, ५० षटकांच्या विश्वचषकात पाकिस्तान प्रथमच भारताला पराभूत करेल. मागील काही वर्षांत त्यांनी सातपैकी एकही सामना जिंकलेला नाही. पण यावेळी पाकिस्तानला यश येईल."
वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकातील भारताचे सामने - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नईभारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्लीभारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबादभारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणेभारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशालाभारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौभारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबईभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाताभारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू