Join us  

Corona Virus : पाकिस्तान अन् इम्रान खान यांना मदत करा; विंडीजच्या महान खेळाडूचं जगाला आवाहन

पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 7025 इतकी झाली आहे आणि 135 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 4:40 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 82,823 इतकी झाली असून 1 लाख 45,551 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे 5 लाख 47,679 लोकं बरी झाली आहेत. पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 7025 इतकी झाली आहे आणि 135 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानातील काही भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशात अनेक स्वयंसेवी संस्था कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तान सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात आता वेस्ट इंडिजच्या महान खेळाडू मायकल होल्डींग यांनी पाकिस्तानला जमेल तशी आणि जमेल तितकी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

श्रीलंकेत होणार का IPL 2020 चे आयोजन? BCCIचं महत्त्वाचं विधान

रात्री 2 वाजता खेळाडूनं केला मॅसेज, बॉस माझ्यात कोरोनाची लक्षणं दिसतायत अन्...

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी आणि त्याची फाऊंडेशन पाकिस्तानातील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 5000 हून अधिक लोकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे. त्यात आता विंडीजचे दिग्गज गोलंदाज होल्डींग यांनी पाकिस्तानला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 

'' आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी निधी जमा करत आहेत. पाकिस्तानला मदत करण्यासाठी तुम्ही त्या देशाचे नागरिक असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही मदत करू शकता. आपण या संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे. पाकिस्तान सरकारला मदत करण्याचं मी आवाहन करत आहे,'' असे मायकल होल्डींग यांनी सांगितले.

होल्डींग यांनी विंडीजसाठी 60 कसोटी सामन्यांत 249, 102 वन डे सामन्यांत 142 विकेट्स घेतल्या आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

इंग्लंडच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूची कोरोनाशी लढाई; प्रकृती चिंताजनक

Video: धर्माच्या नावाखाली धंदा सुरू आहे; आता तरी सुधरा...; इरफान पठाणचा मार्मिक टोला

'दंगल गर्ल' बबिता फोगाटच्या व्हिडीओने खळबळ, ‘तबलिगी जमात’वर प्रक्षोभक टीकास्त्र

भारताविरुद्ध मालिका होत नसल्यानं पाकिस्तानला 690 कोटींचा फटका!

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याइम्रान खानपाकिस्तानवेस्ट इंडिज