मायकेल वॉनने उडवली भारतीय फलंदाजांची खिल्ली! नेटिझन्स म्हणाले,‘शेजारची आँटी...'

भारताच्या या निराश कामगिरीवर प्रत्येकजण टीका करीत आहे. वॉनने तर भारतीय फलंदाजांवर चांगलेच तोंडसुख घेतले. भारतीय चाहते मग मागे कसे असतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:14 AM2021-08-27T10:14:31+5:302021-08-27T10:14:31+5:30

whatsapp join usJoin us
Michael Vaughan mocks Indian batsmen; netizens trolled him | मायकेल वॉनने उडवली भारतीय फलंदाजांची खिल्ली! नेटिझन्स म्हणाले,‘शेजारची आँटी...'

मायकेल वॉनने उडवली भारतीय फलंदाजांची खिल्ली! नेटिझन्स म्हणाले,‘शेजारची आँटी...'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली: ट्विटच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत राहणारा माजी इंग्लंश कर्णधार मायकेल वॉन याने लीड्सवर पहिल्या डावात ७८ धावांत शरणागती पत्करणाऱ्या भारतीय फलंदाजांची चांगलीच खिल्ली उडवली. तथापि भारतीय चाहत्यांचा रोष देखील त्याला पत्करावा लागला. लीड्सवर विराटचा खराब फॉर्म कायम राहिला. मागच्या ५० आंतरराष्ट्रीय डावात विराट एकदाही तिहेरी आकडा गाठू शकलेला नाही.

भारताच्या या निराश कामगिरीवर प्रत्येकजण टीका करीत आहे. वॉनने तर भारतीय फलंदाजांवर चांगलेच तोंडसुख घेतले. भारतीय चाहते मग मागे कसे असतील. त्यांनी वॉनला शेजारची ऑंटी संबोधले. काहींनी तर वॉन हा  नेहमी भारतीय चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा भूकेला असतो व त्यामुळे तो चर्चेत राहू इच्छितो, अशीही टीका केली.
भारतीय संघ बाद होताच वॉनने ट्विट केले. त्याने लिहिले,‘ गुड इव्हिनिंग इंडिया.’ सोबत थम्सअपच्या दोन इमोजी पोस्ट केल्या. टिम इंडियाच्या चाहत्यांना वॉनची ही खिल्ली खेळभावनेच्या विरूद्ध असल्याचे जाणवताच त्यांनीही कमेंट्सचा भडीमार केला. एका चाहत्याने लिहिले,‘कृपया संयम बाळगा, सामना अद्याप संपलेला नाही.’ दुसऱ्या चाहत्याने लिहिले,‘ इंग्लंड ५०० धावा काढणार, असे तुम्हाला वाटते का?’ 

एक चाहता म्हणाला,‘ थोडे दिवस थांबा, मालिका अद्याप संपलेली नाही.’

n एक नेटिझन्स म्हणाला,‘ गुड इव्हिनिंग ब्रदर, तुझी भविष्यवाणी भारतासाठी किती महत्त्वाची आहे, याची आता जाणीव होऊ लागली. भारतात याला शेजारची आँटी असे संबोधले जाते. या आँटीला आपल्या मुलांची नव्हे तर शेजारच्या मुलांचीच जास्त काळजी वाटते. लॉर्ड्स कसोटीचा आनंद घेतला असेल,’अशी आशा आहे.’
n अन्य एक चाहत्याने लिहिले,‘ तुम्ही फार आनंदी होऊ नका. दुसऱ्या कसोटीसारखी स्थिती येथेही होऊ शकते. तुमच्या थकलेल्या संघासाठी हा बदल चांगला असेल. भारतात आज कुणीही खेळपट्टीला दोष दिला नाही. तुम्ही मात्र काही महिन्यांआधी चेन्नई आणि           अहमदाबादच्या खेळपट्टीवर रडगाणे गायले. नरकाश्रूही ढाळले.

Web Title: Michael Vaughan mocks Indian batsmen; netizens trolled him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.