इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन ( Former England captain Michael Vaughan ) सोशल मीडियावरून सातत्यानं टीम इंडियावर टीका करण्याचं काम करत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलदरम्यानही ( WTC final) वॉननं टीम इंडिया हरणार ही भविष्यवाणी केली होती. न्यूझीलंडनं हा सामना ८ विकेट्स राखून जिंकल्यानंतरही वॉननं विराट कोहली अँड टीमची खिल्ली उडवली. आता इंग्लंड-भारत यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी पुन्हा एकदा माजी कर्णधारानं विराट अँड टीमची खिल्ली उडवली आहे आणि यावेळी त्यानं भारतीय महिला संघाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोचरी टीका केली आहे.
टीम इंडियाला पराभूत करणं अवघड, विराट कोहलीची मागणी मान्य करून इंग्लंडनं स्वतःच्याच पायावर मारला धोंडा!
भारतीय महिला संघही इंग्लंड दौऱ्यावर आहेत. काल भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये दुसरा वन डे सामना खेळवण्यात आला. कर्णधार मिताली राजनं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मितालीच्या ५९ आणि शेफाली वर्माच्या ४४ धावांच्या जोरावर महिला संघानं २२१ धावांचे लक्ष्य उभे केले. केट क्रॉसनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात सोफीया डंकली ( ७३), लौरेन विनफिल्ड -हिल ( ४२) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघानं ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
मायकेल वॉननं ट्विट केलं की, भारतीय महिला संघांनी आज दमदार खेळाचे प्रदर्शन केले. इंग्लिश कंडीशनमध्ये एका तरी भारतीय संघाला खेळताना पाहून आनंद झाला.''