पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू!

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा २०२२ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, ICCच्या २०२२ वर्षातील वन डे संघाचे कर्णधारपदही त्याला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 04:01 PM2023-01-30T16:01:16+5:302023-01-30T16:03:53+5:30

whatsapp join usJoin us
Mickey Arthur Pakistan Coach: Micky Arthur set to become World Cricket’s first ONLINE COACH | पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू!

पाकिस्तानची 'ऑनलाईन' शाळा! अथक मेहनतीनंतर बाबर आजमच्या संघाला कोच मिळाला, पण अटी व शर्ती लागू!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) हा २०२२ या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला, ICCच्या २०२२ वर्षातील वन डे संघाचे कर्णधारपदही त्याला मिळाले. पण, पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन काही येताना दिसत नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरून रंगलेले रणकंदन, निवड समिती अध्यक्षपदावरून शाहिद आफ्रिदीची उचलबांगडी झाली. त्यात त्यांच्या संघाला प्रशिक्षक मिळव नव्हता, परंतु अथक मेहनतीनंतर एक प्रशिक्षक तयार झाला आणि त्यानेही अटी अन् शर्ती ठेवल्या. 

पाकिस्तानची आर्थिक कोंडी! बंद करावी लागणार पाकिस्तान सुपर लीग; पगारासाठी फ्रँचायझीकडे पैसे नाही

मिकी आर्थर ( Mickey Arthur) यांची चार वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. पण, आता तेच आर्थर पुन्हा पाकिस्तानच्या संघाला प्रशिक्षण देताना दिसणार आहेत. पण, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी अटी व शर्थी ठेवल्या आहेत. ते पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत आणि प्रत्येक मालिकेसाठी उपस्थित राहणार नाहीत. गरज असेल  तेव्हाच ते संघासोबत असतील. क्रिकेट संघाला ऑन लाईन प्रशिक्षण देणारे ते जगातील पहिलेच प्रशिक्षक असतील.


सकलेन मुश्ताक याचा करार संपुष्टात आला आहे आणि नवीन अध्यक्ष नजम सेठी यांना आर्थरच नवीन प्रशिक्षक म्हणून हवे आहेत. आर्थर यांनी नुकतेच कौंटी क्लब डर्बीशायरशी करार केला आहे. त्यामुळे ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे पूर्ण वेळ प्रशिक्षक असतील की सल्लागार हे अद्याप स्पष्ट नाही. आर्थरने यापूर्व पुन्हा पाकिस्तानला मार्गदर्शन करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. पाकिस्तानी मीडियानुसार आर्थर हे आशिया चशक २०२३ आणि वर्ल्ड कप २०२४ या महत्त्वाच्या स्पर्धांदरम्यान संघासोबत नसतील.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Mickey Arthur Pakistan Coach: Micky Arthur set to become World Cricket’s first ONLINE COACH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.