IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे

By स्वदेश घाणेकर | Published: October 9, 2020 03:32 PM2020-10-09T15:32:31+5:302020-10-09T15:39:52+5:30

whatsapp join usJoin us
Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know  | IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

IPL 2020 Mid Season Transfer windowची तारीख ठरली, ८ फ्रँचायझींच्या रणनीतीला सुरुवात झाली; जाणून घ्या नियम!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वाचा पहिला टप्पा या आठवड्यात पूर्ण होईल.. आतापर्यंत बहुतेक सर्व संघांनी प्रत्येकी ६ सामने खेळले आहेत आणि मुंबई इंडियन्स सहा सामन्यांनंतर ( Mumbai Indians) ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, परंतु ५ सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सनेही ( Delhi Capitals) ४ सामने जिंकून ८ गुणांची कमाई केली आहे. किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) तळाला आहे. चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings), राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांना कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. त्यामुळे प्ले ऑफ ( Play Off) पर्यंत मजल मारायची असेल, तर या संघांना आपल्या कामगिरीचा आलेख उंचवावा लागेल. 

यंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक फ्रँचायझींना पहिल्या हाफनंतर संघात बदल करण्याची संधी मिळणार आहे. ७ सामन्यानंतर संघांना त्यांच्या कामगिरीचे परिक्षण करून त्यानुसार दुसऱ्या टप्प्यासाठी रनणीती आखावी लागणार आहे. BCCI नं त्यासाठी Mid Season Transfer Window ही संकल्पना आणली आहे. IPL 2020 Mid-Season Transfers च्या माध्यमातून पत्येक संघ कमकुवत बाबी भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. १३ ऑक्टोबरला सर्व संघांचे प्रत्येकी ७ सामने पूर्ण होतील आणि तेव्हा ट्रान्सफरला सुरुवात होईल.

काय आहे हे IPL 2020 Mid-Season Transfers? 
BCCIने यंदाच्या मोसमापासून फ्रँचायझींना अन्य संघांकडून खेळाडूंची अदलाबदल करण्याची मुभा दिली आहे. मागील मोसमात ही संधी केवळ अन कॅप म्हणजेच राष्ट्रीय संघांकडून न खेळलेल्या खेळाडूंपुरती मर्यादित होती, परंतु आता राष्ट्रीय खेळाडूंचीही अदलाबदल शक्य आहे.

IPL 2020 Mid-Season Transfers नियम 
लीगच्या मध्यंतरापर्यंत खेळाडूनं दोनपेक्षा अधिक सामने खेळलेले नसावेत. लीगच्या मध्यंतरानंतरच ही अदलाबदल करता येणार आहे. म्हणजे प्रत्येक संघानं प्रत्येकी ७ सामने खेळणे आवश्यक आहेत.

कोणते खेळाडू ठऱणार पात्र? 
दोनपेक्षा कमी सामने खेळलेल्या खेळाडूंची अदलाबदल करता येईल.
अदलाबदल करताना खेळाडूला देण्यात येणारी रक्कम फ्रँचायझीच्या पर्समधून वजा होणार नाही.

कोणत्या संघातील कोणते खेळाडू ठरत आहेत पात्र ?

  • चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - केएम आसीफ, इम्रान ताहीर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, आर साई किशोर, जोश हेझलवूड
  • दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - अजिंक्य रहाणे, आवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, किमो पॉल, संदीप लामीछाने, अॅलेक्स कॅरी, ललित यादव, डॅनिएल सॅम्स, तुषार देशपांडे, मोहित शर्मा
  • किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - अर्षदीप सिंग, दर्शन नळखांडे, कृष्णप्पा गोवथम, हार्डस विलजोईन, ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार, जगदीशा सुचिथ, मनदीप सिंग, मुजीब उर रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुडा, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंग, तजींदर सिंग
  • कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) - प्रसिध कृष्णा, रिंकू सिंग, संदीप वॉरियर्स, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, टॉम बँटन, निखिल नाईक, अली खान
  • मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - आदित्य तरे, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेर्फान रुथरफोर्ड, मिचेल मॅक्लेघन, ख्रिस लीन, नॅथन कोल्टर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय ( मुंबई इंडियन्सच्या ख्रिस लीनने एकही सामना खेळलेला नाही. त्याच्यासाठी चढाओढ रंगू शकते.)
  • सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - बसील थम्पी, बिली स्टँनलेक, मोहम्मद नबी, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवास्तव गोस्वामी, सिद्धार्थ कौल, वृद्धीमान सहा, विजय शंकर, विराट सिंग,
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) - गुरकिरत सिंग मान, मोइन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, अॅडम झम्पा
  • राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - मयांक मार्कंडे, अंकित राजपूत, मनन वोहरा, महिपाल लोम्रेर, शंशांक सिंग, वरूण आरोन, कार्तिक त्यागी, ओशाने थॉमस, अनिरुद्ध जोशी, अँण्ड्रू टे, आकाश सिंग, अनुज रावत
     

Web Title: Mid Season transfer window of IPL 2020 will start from October 13th as all the teams will complete 7 matches each, All you need to know 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.