ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) याला दुखापत झाल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL 2023 साठी संघात कायम ठेवले. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान मॅक्सवेल पडला आणि त्याला ही दुखापत झाली. यानंतर त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तो जवळपास १२ आठवडे म्हणजे तीन महिने क्रिकेट खेळण्यापासून दूर राहणार आहे. त्यानंतर तो कसा केव्हा कमबॅक करेल याची RCB फॅन्सना चिंता लागली आहे. पण, RCBने मॅक्सवेलवर विश्वास दाखवला आणि पुढील हंगामासाठी त्याला कायम ठेवले. मॅक्सवेल आयपीएलच्या १६व्या हंगामापूर्वी पुनरागमन करेल, अशी माहिती RCB चे संचालक माईक हेसन यांनी दिली.
आक्रमक फलंदाज आणि ऑफब्रेक गोलंदाज असलेला मॅक्सवेल दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला. मॅक्सवेल १३ डिसेंबर ते ४ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या बिग बॅश लीगमध्येही खेळू शकणार नाही. अशा स्थितीत त्यांच्या पुनरागमनाची भीती व्यक्त केली जात होती. पण, आरसीबीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये हेसन म्हणाले की, ''ग्लेन मॅक्सवेलबद्दल थोडी चिंता आहे. आम्ही त्याला लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा देतो. आमच्याकडे अशी माहिती आहे की तो आयपीएलच्या (पुढील वर्षी) खूप आधी पुनरागमन करेल आणि क्रिकेट खेळेल. त्या संघाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने संघात थ्रीडी खेळाडू असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.''
११ कोटी रुपये मोजून संघात कायम ग्लेन मॅक्सवेलन आयपीएल २०२१ च्या मोसमात प्रभावी कामगिरी केली आणि त्यानंतर फ्रँचायझीने त्याला ११ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. मॅक्सवेलने गेल्या मोसमात १३ सामन्यात ३०१ धावा केल्या होत्या. हेसनने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे गेल्या मोसमात फिनिशर म्हणून केलेल्या प्रभावी कामगिरीचेही कौतुक केले. तो म्हणाला, 'आम्ही फॅफ, विराट, फिन ऍलन आणि रजत पाटीदार टॉप ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. आम्ही याला खरोखर मजबूत टॉप ऑर्डर म्हणून पाहतो,ज्यामध्ये आवश्यक असल्यास आम्ही बदल करू शकतो. गेल्या वर्षी कार्तिकने फिनिशरच्या भूमिकेत खूप चांगले योगदान दिले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
- रिलीज केलेले खेळाडू - जेसन बेहरेनडॉर्फ, अनिश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनीथ सिसोदिया, शेरफेन रुथरफोर्ड.
- पर्समध्ये शिल्लक रक्कम - ८.७५ कोटी
- कायम राखलेले खेळाडू - फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत, फिन ॲलेन, ग्लेन मॅक्सवेल, वानिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, महिपाल लोम, महिपाल लोम सिराज, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, आकाश दीप.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"