मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता मुलाखती सुरू झाल्या आहेत. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह या पदासाठी सहा जण शर्यतीत आहेत. मुख्य प्रशिक्षकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) काही अटी सांगितल्या होत्या. त्यानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव असायला हवा. परंतु, सध्या आलेल्या सहा अर्जांपैकी एक उमेदवार एकही सामना खेळलेला नाही. तरीही प्रशिक्षकपदासाठी त्याचं नाव चर्चेत आहे. कोण आहे तो शिलेदार?
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून हेसन आघाडीवर आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंड संघाने 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सहा वर्ष ते न्यूझीलंडच्या प्रशिक्षकपदावर कार्यरत होते. 2018 मध्ये त्यांचा करार संपला. सध्या ते इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मार्गदर्शन करत होते.
44 वर्षीय यांच्याकडे प्रशिक्षकपदावर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असला तरी त्यांच्याकडे क्रिकेटपटू म्हणून अनुभव नाही. त्यांनी न्यूझीलंडकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्यांच्याकडे केनिया संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आली. त्यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध केले होते, परंतु त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2012साली त्यांनी न्यूझीलंडच्या कर्णधारपदी जॉन राईट यांची जागा घेतली. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासह हेसन यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज केला आहे.
प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी
मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत
त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत
Web Title: Mike Hesson not played single match for his country, but still applied for team india head coach post
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.