Join us  

डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी

डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:01 AM

Open in App

दुबई : न्यूझीलंडचे माईक हेसन यांची भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी क्रिकेट समितीत आॅस्ट्रेलियाचे डॅरेन लेहमन यांच्याऐवजी वर्णी लागली आहे. लेहमन यांनी मार्चमध्ये चेंडू कुरतडल्याप्रकरणी वाद उद्भवताच प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलेला.आॅस्ट्रेलियाच्या महिला संघाची माजी कर्णधार आणि आयसीसी हाफ आॅफ फेम बेलिंडा क्लार्क तसेच स्कॉटलंडचा कर्णधार केली कोएत्झर यांचाही या समितीत समावेश आहे. अ‍ॅन्ड्र्यू स्ट्रॉस तसेच माहेला जयवर्धने हे खेळाडूंचे प्रतिनिधी आहेत. सर्वांना तीन वर्षांसाठी स्थान देण्यात आले. समितीची पहिली बैठक याच आठवड्यात मुंबईत होईल. यात क्रिकेट भावना, खेळाडूंचे वर्तन, विश्व कसोटी चॅम्पियनशिप, प्लेर्इंग कंडिशन्स आदी मुद्यांवर चर्चा होईल.आयसीसी समितीअध्यक्ष : अनिल कुंबळे, पदसिद्ध अधिकारी : शशांक मनोहर (आयसीसी अध्यक्ष) व डेव्हिड रिचर्डसन (सीईओ). माजी खेळाडू प्रतिनिधी : अ‍ॅन्ड्र्यू स्ट्रॉस, माहेला जयवर्धने. विद्यमान खेळाडू प्रतिनिधी : राहुल द्रविड , टिम मे. पूर्णकालीन सदस्य कोच प्रतिनिधी : माईक हेसन. सहयोगी सदस्य प्रतिनिधी : केली कोएत्झर. महिला क्रिकेट : बेंिलडा क्लार्क. पूर्णकालीन प्रतिनिधी : डेव्हिड व्हाईट. माध्यम : शॉन पोलाक. पंच : रिचर्ड केटलबरो. रेफ्री : रंजन मदुगले. एमसीसी प्रतिनिधी : जॉन स्टीफन्सन.

टॅग्स :आयसीसी