मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर

लखनौविरुद्ध गुजरात टायटन्स ५ गड्यांनी विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 05:08 AM2022-03-29T05:08:46+5:302022-03-29T05:09:31+5:30

whatsapp join usJoin us
Miller-Rahul Tewatia became 'Giant' Killer | मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर

मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रोहित नाईक

मुंबई : गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये विजयी सुरुवात करताना लखनौ सुपर जायंट्स संघाला ५ गड्यांनी नमवले. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी पाचव्या गड्यासाठी केलेली ६० धावांची भागीदारी गुजरातच्या विजयात निर्णायक ठरली. लखनऊला ६ बाद १५८ धावांवर रोखल्यानंतर गुजरातने १९.४ षटकात ५ बाद १६१ धावा केल्या. वानखेडे स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची २ बाद १५ धावा अशी अडखळती सुरुवात झाली.

कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्थिरावलेला मॅथ्यू वेड फारशी चमक न दाखवता बाद झाल्यानंतर लखनऊचे पारडे वरचढ झाले. मात्र, मिलर आणि तेवतिया यांनी मोक्याच्यावेळी फटकेबाजी करत गुजरातला विजयी मार्गावर आणले. १६ व्या षटकापासून दोघांनी चौफेर फटके मारत लखनऊच्या गोलंदाजीतील हवा काढली. मिलरनंतर नवख्या अभिनव मनोहरने संघाच्या विजयावर शिक्का मारला. त्याआधी, संघाची ४ बाद २९ अशी अवस्था झाली असताना दीपक हुडा आणि आयुष बदोनी यांनी झुंजार अर्धशतक झळकावत लखनऊला समाधानकारक मजल मारून दिली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन प्रमुख फलंदाजांना स्वस्तात बाद करत लखनौचे कंबरडे मोडले. लखनऊसाठी शंभर धावाही कठीण दिसत असताना हुडा-बदोनी यांनी पाचव्या गड्यासाठी ८७ धावांची मोलाची भागीदारी केली. राशिद खानने १६व्या षटकात हुडाला पायचीत पकडत ही जोडी फोडली. यानंतर बदोनीने कृणाल पांड्यासह (२१*) लखनौला सावरले. 

गुजरातविरुद्ध दुसरा भोपळा!
पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झालेला लोकेश राहुल आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. याआधी २०१६ मध्ये तो गुजरात लायन्सविरुद्धच शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आता पुन्हा गुजरात टायटन्सविरुद्ध त्याला भोपळा फोडता आला नाही.

गुजरातच्या विजयात १६ वे षटक गेम चेजिंग ठरले. डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी दीपक हुडाच्या षटकात २ षटकार आणि २ चौकार लगावत तब्बल २२ धावा वसूल केल्या आणि सामना गुजरातच्या बाजूने झुकला. 

गिलचा अविश्वसनीय झेल
वरुण ॲरोनच्या गोलंदाजीवर गिलने आक्रमक इव्हान लेविस अप्रितम झेल घेत त्याला १० धावांवर तंबूत पाठवले. 

Web Title: Miller-Rahul Tewatia became 'Giant' Killer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.