Join us  

ऋषभ पंतच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी

पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 6:29 AM

Open in App

डेहराडून : अपघातात जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी त्याच्या कपाळावर किरकोळ प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) संचालक श्याम शर्मा यांनी पंत याची विचारपूस केली.पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले की, त्याची चांगली काळजी घेत आहेत. बीसीसीआयही त्यांच्या संपर्कात आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळलेला आहे. त्याला दिल्लीला हलवायचे की नाही याबाबत अद्याप आम्ही निर्णय घेतलेला नाही. शुक्रवारी पहाटे दिल्ली-डेहराडून महामार्गावर त्याची कार दुभाजकावर आदळली आणि कारने पेट घेतला. ऋषभ आईला भेटण्यासाठी मूळ गावी रुरकी येथे जात होता. त्याच्या डोक्याला, पाठीला व पायाला दुखापत झाली आहे. बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर आणि अनुपम खेर यांनीही पंत याची रुग्णालयात भेट घेतली. 

टॅग्स :रिषभ पंत
Open in App