Join us  

'चमत्कारी' गोलंदाजीतील जीव काढण्यासाठी किवींचा मोठा डाव; भारताच्या माजी कोचला घेतलं ताफ्यात

कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाने भारताच्या माजी कोचला त्यांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 12:27 PM

Open in App

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ अफगाणिस्तानच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी ग्रेटर नोएडात दाखल झालाय. भारतीय मैदानात अफगाणिस्तानला शह देण्यासाठी किवींनी खास प्लान तयार केला आहे. या कसोटी सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाने भारताच्या माजी कोचला त्यांनी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. 

भारताचा माजी प्रशिक्षक न्यूझीलंडला देणार बॅटिंगचे धडे 

अफगानिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारतीय खेळपट्टीवर खेळताना बॅटिंगला धार देण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाने मोठा डाव खेळला आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक विक्रम राठोड आता न्यूझीलंडच्या संघाला बॅटिंगचे धडे देणार आहेत. द्रविडच्या कार्यकाळात विक्रम राठोड यांनी भारतीय संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या रुपात काम पाहिले आहे. 

अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटीआधी न्यूझीलंडनं खेळला मोठा डाव

विक्रम राठोड एकमेव कसोटी सामन्यासाठी न्यूझीलंडच्या टीमशी जोडले गेले आहेत, अशी माहिती न्यूझील क्रिकेटनं दिली आहे. दिल्ली जवळील  ग्रेटर नोएडा येथील अफगानिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याच्या तयारीसाठी विक्रम राठोड यांना बोलवण्यात आले आहे, असा उल्लेख न्यूझीलंड क्रिकेटनं म्हटले आहे.विक्रम राठोड यांनी नव्वदीच्या दशकाच्या अखेरीस भारताकडून ६ कसोटी सामने खेळले आहेत. २०१२ मध्ये ते टीम इंडियाच्या निवड समितीचे सदस्य देखील होते.  

फिरकी गोलंदाजांसाठीही स्पेशल कोच

भारतीय खेळपट्टी ही जलदगती गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीसाठी अधिक अनुकूल असते. याचाच विचार करुन न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेच्या  रंगान हेराथ या माजी क्रिकेटरची फरकी गोलंदाजांच्या प्रशिक्षकाच्या रुपात नियुक्ती केली आहे. आशियातील ३ सामन्यांसाठी रंगान हेराथ न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसेल. तो पाकिस्तानाचा माजी फिरकीपटून आणि कोच सकलेन मुश्ताक याची जागा घेईल. या महिन्याच्या अखेरीस न्यूझीलंड संघ श्रीलंका दौऱ्यावर कसोटी सामने खेळणार आहे. त्यावेळीही रंगान हेराथ न्यूझीलंडच्या संघाचा भाग असेल. 

श्रीलंका दौऱ्यानंतर पुन्हा न्यूझीलंडचा संघ करणार आहे भारत दौरा

न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यानंतर श्रीलंकेचा दौरा करणार आहे. १८ सप्टेंबरपासून ते दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात करतील. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

टॅग्स :न्यूझीलंडभारतीय क्रिकेट संघभारतअफगाणिस्तान