नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हककडे आता मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मिसबाहकडे संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्रे मिळू शकतात. त्याचबरोबर निवड समितीमध्येही त्याला स्थान मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
आज भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात आला. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने आज प्रशिक्षकपदासाठीच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्या आल्या. आता काही वेळातच भारताचे मुख्य प्रशिक्षक कोण असेल, ते आपल्याला समजणार आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, दोन व्यक्ती क्रिकेट चाहत्यांचं लक्ष्य ठरल्या होत्या. या दोघांना हटवण्याची जोरदार मोहीमच सोशल मीडियावर चालली होती. त्यापैकी एक होता कर्णधार विराट कोहली आणि दुसरी व्यक्ती होती टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री. संघ एकसंध बांधण्यात, चौथ्या क्रमांकाचा पेच सोडवण्यात आणि एकूणच निर्णयप्रक्रियेत ही जोडगोळी अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विराटकडून कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यावं आणि रवी शास्त्रींनाही 'नारळ' द्यावा, असं अनेकांचं ठाम मत होतं. परंतु, विराटचं कर्णधारपद टिकून आहे आणि संघाच्या प्रशिक्षकपदीही बहुधा शास्त्री गुरुजींचीच फेरनिवड होण्याची चिन्हं दिसताहेत. कारण, प्रशिक्षकपदासाठी जे सहा शिलेदार मैदानात आहेत, त्यात रवी शास्त्रींचं पारडं जड वाटतंय.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज सकाळी साडे दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) हेड कोचची निवड करणार आहे. या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या छाननीनंतर सहा शिलेदार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उरलेत. ते आहेत, टॉम मुडी, माईक हेसन, फिल सिमन्स, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि रवी शास्त्री.
पाकिस्तानच्या संघाची विश्वचषकात फारशी चांगली कामगिरी झाली नाही. त्यानंतर प्रशिक्षक मिकी आर्थर यांना प्रशिक्षक पदावरून वगळण्यात आले. त्याचबरोबर निवड समिती अध्यक्ष आणि माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही दोन्ही पदे आता रीक्त आहेत. त्यामुळे या दोन्ही पदावर एकच व्यक्ती असावा असे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला वाटत आहे. त्यामुळे मिसबाहला आता या दोन्ही पदांवर नियुक्त केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: Misbah ul Haq may be the head coach
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.