नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२२ला (T20 World Cup 2022) आजपासून सुरूवात झाली आहे. सुपर-१२ फेरी गाठण्यासाठी श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात लढत पार पडली. ज्यामध्ये नामिबियाच्या संघाने विजय मिळवला. मात्र सध्या पाकिस्तानचा माजी खेळाडू मिस्बाह उल हकचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू शोएब मलिक, वसीम अक्रम आणि मिस्बाह उल हक एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत.
मिस्बाह उल हकने सांगितली फजितीमिस्बाह उल हक या कार्यक्रमात २०१५ मधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यातील एक मजेशीर किस्सा सांगत आहे. मिस्बाहने सोहेल खानची फजिती सांगताना म्हटले, "मी नेहमी गोलंदाजाच्या बाजूला फिल्डिंगसाठी उभा असतो. माझ्या बाजूला सोहेल खान होता त्याला मी सांगितलं तू तिकडे जा. मी मिड ऑनला येतो कारण इथे फलंदाज चांगला खेळतो. मात्र सोहेल खानचे नशीब खराब ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने लॅंगर शॉर्ट मिड ऑफच्या दिशेने मारला, चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जात होता, सोहेल पण चेंडूच्या मागे धावत होता. बाउंड्रीवर जाऊन त्याने चेंडू अडवला पण नंतर पायाने चेंडू मुद्दाम बाउंड्री लाइनवर ढकलला. मी ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर त्याला विचारले की तू थांबलेला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पाठवलास. तेव्हा तो बोलला मिस्बाह भाई मी जेव्हा चेंडू अडवला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चौथी धाव काढत होते, मग ते ५ धावा काढतील म्हणून मी चौकार सोडला आणि एक धाव वाचवली."
टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"