कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर The Hundred ही लीगही 2021पर्यंत पुढे ढकलण्यात आली. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चितितेचं सावट आहे. पाकिस्तान सुपर लीगही रद्द करण्यात आली. त्यामुळे क्रीडा चाहत्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. हे नैराश्य दूर करण्यासाठी पाकिस्तानलाइंग्लंड दौऱ्यावर जाऊद्या आणि तेथे कसोटी मालिका खेळू द्या, अशी विनंती पाकिस्तानच्या माजी कर्णधारानं केली आहे.
Shah Rukh Khan खरंच The Hundred लीगमध्ये गुंतवणूक करणार का? KKR कडून मोठी अपडेट
माजी कर्णधार मिसबाह उल हक म्हणाला,''इंग्लंड-पाकिस्तान मालिका बंद दरवाजात खेळवणे, हा चांगला पर्याय नाही, परंतु या मालिकेमुळे अनेकांचे औदासीन्य दूर होईल.'' पाकिस्तानचा संघ 30 जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणे अपेक्षित आहे. मिसबाह हा पाकिस्तान संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे आणि निवड समिती प्रमुखही आहे. त्याने सांगितले की,''कोरोना व्हायरसच्या संकटातही कुठेतरी क्रीडा स्पर्धा होणे, हे चाहत्यांसाठी चांगली गोष्ट आहे.''
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सनं मिसबाहच्या प्रस्तावाला पाठींबा दर्शविला आहे. तो म्हणाला,''पुन्हा क्रिकेट सुरू होण्यासाठी खेळाडू सर्वतोपरी प्रयत्न करतील. निदान टिव्हीवर तरी चाहत्यांना क्रिकेट पाहता येईल.''
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास अडचण नाही : अख्तरनवी दिल्ली : जर मला प्रस्ताव मिळाला तर भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास मला कुठली अडचण नसून मी अधिक आक्रमक वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले. शोएबने ही इच्छा सोशल नेटवर्किग अॅप ‘हॅलो’वर मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
भविष्यात भारतीय गोलंदाजी विभागासोबत जुळण्याची इच्छा आहे का, याबाबत अख्तरने सकारात्मक उत्तर दिले. सध्या भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण जबाबदारी सांभाळत आहेत. क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान मारा करणाऱ्या गोलंदाजांमध्ये समावेश असलेला अख्तर म्हणाला, ‘मी सध्या असलेल्या गोलंदाजांच्या तुलनेत अधिक आक्रमक, वेगवान आणि आव्हान देणारे गोलंदाज तयार करीन. हे गोलंदाज फलंदाजांना आव्हान देण्यास सक्षम असतील.’
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार
जब मिल बैठेंगे तीन यार; बीअर पिण्यासाठी Ravi Shastri यांनी निवडले दोन क्रिकेटपटू
धक्कादायक : ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूच्या Ex-Girlfriend ला अटक