भारताच्या कसोटी संघाचा यष्टिरक्षक वृद्घीमान साहा याच्या घरी शुक्रवारी मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. साहाच्या सिलिगुरी येथील घरात सहा चोर घुसल्याची माहिती यष्टिरक्षकाच्या नातेवाईकांनी दिली. सुदैवानं तेव्हा घरात कोणीच नव्हतं. 35 वर्षीय साहा पत्नी आणि मुलांसोबत दक्षिण कोलकाता येथे राहतो.
''आम्ही साहाच्या घरा शेजारी राहतो. शुक्रवारी साहाच्या घरातून माझ्या मुलाला कसला तरी आवाज आला. मध्यरात्रीचे दोन-अडीच वाजले असतील. आम्ही लगेच उठलो आणि घरातील दिवे लावले. चोरांना हे समजले असावे आणि त्यांनी लगेचच तेथून पळ काढला. ते कारने आले होते, परंतु अंधारात त्यांच्या गाडीचा क्रमांक पाहू शकलो नाही,'' असे साहाचे काका मलाय यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,''लगेचच आम्ही पोलिसांना हे कळवले आणि पोलीस घटनास्थळी आले. काही दिवसांपूर्वी असाच चोरीचा प्रकार घडला होता. आम्ही FIR दाखल केली आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Virat Kohli अन् ABD चा पुढाकार; कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आर्थिक मदत करणार
विराट कोहली RCBची साथ सोडणार? टीम इंडियाच्या कर्णधाराचं मोठं विधान
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी Good News: 'विराट'सेनेचा ऑगस्टमध्ये परदेश दौरा?
Kapil Dev यांनी पाकिस्तानला सुनावलं; पैशांची एवढी चणचण आहे, तर सीमेवरील दहशतवाद बंद करा!
स्टार फुटबॉलपटूच्या आईचं 22 वर्षीय बॉयफ्रेंडसोबत Break Up; कारण ऐकून बसेल धक्का
Big News : Corona Virus च्या संकटात ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची निवृत्ती
ऑस्ट्रेलियाच्या माजी अष्टपैलू खेळाडूचे कॅन्सरमुळे निधन
Video : तंदुरुस्तीसाठी Mohammed Shamiची कसून मेहनत; शेतात अनवाणी पायाने धाव