वानूआतू : कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात क्रीडा स्पर्धांचे आयोजन ठप्प झाले असताना आज शनिवारी वानूआतूमध्ये महिला स्थानिक क्रिकेट लीगची फायनल खेळल्या जाणार आहे. उत्तर ऑस्ट्रेलियाच्या पूर्वला असलेला या बेटावर क्रिकेट लोकप्रिय आहे. दक्षिण प्रशांत क्षेत्रातील हे उष्णकटिबंधीय बेट असे एकमेव स्थान आहे की जेथे स्पर्धात्मक क्रिकेटचे यजमानपद भूषविले जात आहे.जर कुणाला क्रिकेटच्या ‘लाईव्ह अॅक्शन’ची उणीव भासत असेल ते वानूआतू क्रिकेटच्या फेसबुकवर ही लढत बघू शकतात. वानूआतू क्रिकेट संघटनेचे मुख्य कार्यकारी शेन डेट््जसुद्धा ही लढत बघण्यासाठी आमंत्रित करीत आहेत.महिलांच्या या लढतीत सकाळी टाएफा ब्लॅकबडर्््स व पॉवर शार्क्स हे संघ समोरासमोर असतील तर विजेता संघ स्थानिक लीगच्या फायनलमध्ये मेले बुल्सविरुद्ध खेळेल. दरम्यान, पुरुषांची एक मैत्री लढतही याच दिवशी खेळली जाणार आहे.डेट््जने असोसिएट प्रेसला सांगितले की, ‘सध्या जगात ही एकमेव क्रीडा स्पर्धा सुरू आहे. जे लॉकडाऊनमध्ये आहेत त्यांना आम्ही थोड क्रिकेट दाखवू शकतो.’वानूआतू क्रिकेटच्या फेसबुकवर ही लढत आॅनलाईन बघता येईल. त्यात चार कॅमेरे असून समालोचनही करण्यात येणार आहे.वानूआतूमध्ये कोरोना व्हायरस महामारीदरम्यान सावधगिरी बाळगताना गेल्या महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर ६ एप्रिल रोजी येथे वादळही आले होते. येथील नागरिक लाकडाऊन उघडल्याचा जल्लोष साजरा करीत आहेत. देशाच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे येथे कोविड-१९ चा एकही रुग्ण आढळलेला नाही. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- CoronaVirus: जगात क्रिकेट केवळ वानूआतूमध्ये; महिला क्रिकेट लीग फायनल आज
CoronaVirus: जगात क्रिकेट केवळ वानूआतूमध्ये; महिला क्रिकेट लीग फायनल आज
दक्षिण प्रशांत क्षेत्रातील हे उष्णकटिबंधीय बेट असे एकमेव स्थान आहे की जेथे स्पर्धात्मक क्रिकेटचे यजमानपद भूषविले जात आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 2:21 AM