Mission #T20WorldCup भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना

बीसीसीआयने टीम इंडियाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 07:55 AM2022-10-06T07:55:24+5:302022-10-06T07:56:14+5:30

whatsapp join usJoin us
Mission T20WorldCup rohit sharma virat kohli team india flew for the t20 world cup 2022 to be held in australia bcci shared photo | Mission #T20WorldCup भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना

Mission #T20WorldCup भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

१६ ऑक्टोबरपासून T20 विश्वचषक २०२२ चे बिगुल वाजणार आहे. प्रत्येक संघ मजबूत तयारीनीशी ऑस्ट्रेलियात पोहोचत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी पहाटे T20 विश्वचषकासाठी रवाना झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघाचे १४ खेळाडू डाव्या बाजूला, तर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचा इतर सपोर्ट स्टाफ उजवीकडे उभे आहेत.

जसप्रीत बुमराह या संघाचा १५ वा सदस्य होता. परंतु टी-20 विश्वचषकापूर्वीच हा स्टार भारतीय खेळाडू पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. बीसीसीआयने अद्याप बुमराहच्या जागी कोणाला संधी दिली जाईल याबाबत माहिती दिलेली नाही. त्यामुळेच या फोटोमध्ये १५ ऐवजी १४ खेळाडू दिसत आहेत. बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी यांच्याशिवाय दीपक चहरला स्टँडबाय ठेवले आहे.


टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पार केल्यानंतरच तो ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो.

भारताचा T20 विश्वचषक संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, दीपक हुडा

 

Web Title: Mission T20WorldCup rohit sharma virat kohli team india flew for the t20 world cup 2022 to be held in australia bcci shared photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.