Join us  

लागली पैज; क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजाला अशा 'विचित्र' पद्धतीनं बाद झालेलं पाहिलं नसेल 

अंपायरची 'पंच'गीरी पाहून डोक्यावर माराल हात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 1:28 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटातही सुरू झालेल्या इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमुळे क्रिकेटचाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मागील तीन महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांसाठी ही मालिका पर्वणीच ठरली. वेस्ट इंडिजनं पहिल्या कसोटीत 4 विकेट्स राखून विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना कालपासून सुरू झाला आणि पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी वर्चस्व मिळवलं. कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झाले असले तरी अनेक ठिकाणी ट्वेंटी-20, टी 10 क्रिकेटचे प्रयोग सुरू होते. याच प्रयोगात एक अजब विकेट पाहायला मिळाली.  

सध्या युरोपियन क्रिकेट लीग सुरू आहे आणि त्यातून युरोपात क्रिकेटचा प्रसार सुरू आहे. पण, या लीगमध्ये अनेक चुकाही पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या लीगमधील एक चूक दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात पंचांनी ज्या पद्धतीनं फलंदाजाला बाद दिलं, ते पाहून अनेकांना डोक्यावर हात मारावासा नक्की वाटला असेल. गोलंदाज आणि अन्य खेळाडूंनी फलंदाज बाद असल्याची अपील पंचांकडे केली आणि पंचांनं वेळ न दवडता फलंदाजाला बाद दिलं.

पंचांच्या या निर्णयावर फलंदाजानं नाराजी प्रकट केलीच. शिवाय रिप्लेत पंचाकडून किती मोठी चूक झालीय हे दिसताच सर्वांना हसू आवरले नाही. 

पाहा व्हिडीओ...

याच लीगमध्ये गोल्डन बॉल हा नवीन प्रयोग केला जात आहे.

  • काय आहे गोल्डन बॉल?
  • सामना बरोबरीत सुटल्यानंतर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त चेंडू टाकला जातो आणि त्यात त्यांना दोन किंवा त्याहून अधिक धावा करणं बंधनकारक आहे. 
  • सामना बरोबरीत राहिल्यानंतर तीन मिनिटांच्या आत गोल्डन बॉल फेकायला हवा. 
  • धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिलेला फलंदाज हा गोल्डन बॉलचा सामना करू शकतो. 
  • गोल्डन बॉलमध्येही निकाल न लागल्यास साखळी सामन्यातील कामगिरीवरून विजेता संघ निवडला जातो.  

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही! 

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! 

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस

 

टॅग्स :सोशल व्हायरल