सचिन कोरडे : एक काळ असाही होता की, भारतीय महिला क्रिकेटचा सामना सुरू असल्याचेही कुणालाही माहीत नसायचे. मात्र, आता परिस्थिती बदललीय. मिताली राज, हरमनप्रित, स्मृती मानधना यांसारख्या खेळाडूंनी या क्रिकेटचा स्तर उंचावला आणि महिला क्रिकेटलाही ग्लॅमर मिळवून दिले. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक मुली आता ‘वेटिंग’वर आहेत. याच स्पर्धात्मक वातावरणातून एकदिवसीय क्रिकेटला बुधवारी एक नवा चेहरा गवसला तो म्हणजे प्रिया पुनिया.
राजस्थानच्या या २३ वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ७५ धावांची खेळी करीत अनेकांचे लक्ष वेधले. क्रिकेटविश्वाला आता या प्रियाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे ही प्रिया आहे तरी कोण? असा प्रश्न त्यांना पडलाय. प्रियाने बुधवारी स्टार फलंदाज मिताली राज हिचेही मन जिंकले. प्रियाचे अर्धशतक पूर्ण होताच पव्हेलियनमध्ये पॅड बांधून उभी असलेली मिताली प्रियाचे कौतुक करीत होती. उत्कृष्ट सलामीवीर गवसल्याची तिची भावना तिच्या चेहºयावर स्पष्ट झळकत होती.
भारतीय महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात अर्धशतक झळकविणारी प्रिया ही सातवी फलंदाज आहे. तिच्या शानदार खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना मितालीसाठी संस्मरणीय ठरला; कारण मितालीने या सामन्यादरम्यान २० वर्षे खेळण्याचा विक्रम पूर्ण केला. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी जेव्हा प्रियाच्या डोक्यावर भारताची कॅप चढली तेव्हा तिच्या प्रदर्शनाकडे सर्वांच्या नजरा होत्या. रॉड्रिग्ससोबत ती फलंदाजीला उतरली तेव्हा ती अत्यंत सावधपणे खेळत होती. तिच्या संथ फटकेबाजीवरून ती आक्रमकही असेल असे वाटत नव्हते. मात्र, रॉड्रिग्स बाद झाल्यानंतर प्रियाने आपण भविष्यातील सलामीवीर असल्याचे सिद्ध केले.
क्रिकेट पीचवर प्रिया...
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात अर्धशतक झळकविणाºयांचा यादीत प्रियाचा समावेश. यापूर्वी मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, अंजू जैन, करुणा जैन यांनी हा पराक्रम केला आहे.
- पदार्पणात सर्वाधिक म्हणजे नाबाद ७५ धावांची खेळी करणारी प्रिया चौथी फलंदाज आहे.
- महिलांच्या आयपीएलमध्ये तिने सामनावीर पुरस्कार पटकाविला होता.
- पहिल्याच एकदिवसीय सामन्यातही ती सामनावीर ठरली.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणात विजयी धावा करणारी ती खेळाडू ठरली.
- टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध याच वर्षी तिने पदार्पण केले.
Web Title: Mitali Raj praises good words for priya punia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.