Join us  

भारत दौऱ्यासाठी मिशेल मार्श आॅस्ट्रेलिया ‘अ’चा कर्णधार

अष्टपैलू मिशेल मार्शकडे या वर्षअखेर होणाºया भारत दौºयासाठी आॅस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मार्श चार दिवसांच्या सामन्यात नेतृत्व करणार असून, वन-डे संघाचे नेतृत्व ट्रॅव्हिस हेड करणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 2:59 AM

Open in App

मेलबोर्न : अष्टपैलू मिशेल मार्शकडे या वर्षअखेर होणाºया भारत दौºयासाठी आॅस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. मार्श चार दिवसांच्या सामन्यात नेतृत्व करणार असून, वन-डे संघाचे नेतृत्व ट्रॅव्हिस हेड करणार आहे.वन-डे संघ तिरंगी मालिकेत सहभागी होणार असून, भारत अ आणि द. आफ्रिका अ हे अन्य दोन संघ असतील. ही मालिका आॅगस्टमध्ये विजयवाडा येथे खेळविली जाईल. चार दिवसांचे सामने सप्टेंबर महिन्यात होतील. मार्शला भविष्यातील कसोटी कर्णधार मानले जात आहे. तो १४ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. या संघात अ‍ॅलेक्स केरी, अ‍ॅश्टन एगर, पीटर हॅन्ड्सकोम्ब, ट्रॅव्हिस हेड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा, जोएल पेरिस, मॅथ्यू रेनशॉ आणि ख्रिस ट्रेमेन यांचा समावेश आहे.माजी दिग्गज खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट याने मार्शला राष्टÑीय संघाचा उपकर्णधार बनविण्याची शिफारस केली. सध्या हे पद टीम पेनकडे आहे. भारत अ विरुद्ध २ सप्टेंबरपासून विशाखापट्टणम येथे होणाºया दोन सामन्यांत २६ वर्षांच्या मार्शकडे नेतृत्वगुणांची चुणूक दाखविण्याची मोठी संधी असेल.आॅस्ट्रेलियाचे राष्टÑीय निवडकर्ते ट्रॅव्हर हॉन्स म्हणाले, ‘आम्ही भविष्यातील आॅस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व शोधत आहोत. ट्रॅव्हिस, मार्श आणि अ‍ॅलेक्स हे सर्व युवा खेळाडू प्रतिभावान आहेत. हा दौरा आॅस्ट्रेलियाच्या पाकिस्तानसोबत यूएईत होणाºया दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी महत्त्वपूर्ण असेल.’ (वृत्तसंस्था)भारत दौºयासाठी आॅस्ट्रेलिया संघचार दिवसांचे सामने : मिशेल मार्श (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार), अ‍ॅश्टन एगर, ब्रेंडन डॉगेट, पीटर हॅन्ड्सकोम्ब, ट्रॅव्हिस हेड, जॉन हॉलंड, उस्मान ख्वाजा, मायकेल नेसर, जोएल पॅरिस, कुर्टिस पॅटरसन, मॅथ्यू रेनशॉ, मिच स्वेपसन, ख्रिस ट्रेमेन. वन-डे संघ : ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार), अ‍ॅश्टन एगर, पीटर हॅन्ड्सकोम्ब,उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबसचगेन, मायकेल नेसर, मॅथ्यू रेनशॉ, झाय रिचर्डसन, डी आर्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मिच स्वेपसन, ख्रिस ट्रेमेन, जॅक वाईल्डमथ.