Mitchell Marsh Liam Livingstone Arshdeep Singh, IPL 2022 PBKS vs DC: मिचेल मार्शच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने २० षटकांत १५९ धावा केल्या आणि पंजाब किंग्जला १६० धावांचे आव्हान दिले. दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पण स्टार अष्टपैलू मिचेल मार्शने ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावा करत दिल्लीला १५०पार मजल मारून देण्यात मोठा वाटा उचलला. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ३-३ बळी टिपले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीच्या संघाने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट गमावली. त्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्श यांनी फटकेबाजी केली. सर्फराज खानने १६ चेंडूत ३२ धावांची वेगवान खेळी केली. ललित यादव पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला होता, पण नो बॉलने त्याला वाचवले. त्यानंतर २१ चेंडूत २४ धावा काढून तो माघारी परतला. कर्णधार रिषभ पंत (७) आणि रॉवमन पॉवेल (२) यांनी चाहत्यांची निराशा केली.
मिचेल मार्शने मात्र अप्रतिम फलंदाजी केली. ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साथीने मार्शने ४८ चेंडूत ६३ धावांची दमदार खेळी केली. तो १९व्या षटकात बाद झाला. त्यानंतर शार्दुल ठाकूर ३ धावांवर माघारी परतला. पण अक्षर पटेलने १५ धावांची उपयुक्त खेळी करत संघाला १५० पार मजल मारून दिली.
दिल्लीचा संघ- डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, रिषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद
पंजाबचा संघ- जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
Web Title: Mitchell Marsh Classic Fifty as Delhi Capitals gives target of 160 Runs to win to Punjab Kings Liam Livingstone Arshdeep Singh IPL 2022 PBKS vs DC Live Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.