BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

२३ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं या लीग स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:26 IST2025-01-27T19:10:28+5:302025-01-27T19:26:18+5:30

whatsapp join usJoin us
Mitchell Owen Record Fastest Century Hobart Hurricanes Win BBL Title 1st Time Fan Turned-Player Set for Australia Call Up X Factor Replacement in IPL 2025 | BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

BBL 2025 : कधीकाळी होता जबरा फॅन! आता विक्रमी सेंच्युरीसह संघाला चॅम्पियन करून ठरला हिरो

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mitchell Owen Century Hobart Hurricanes Win BBL Title 1st Time :  ऑस्ट्रेलियन देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगमध्ये  होबार्ट हेरीकेन्स संघानं आपली पहिली वहिली ट्रॉफी जिंकलीये. सिडनी थंडर संघाला ७ विकेट्सनं पराभूत करत होबार्ट हेरीकेन्स संघ बिग बॅश लीगमधील नवा चॅम्पियन ठरला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जबरा फॅन ते चॅम्पियन संघाचा फास्टेस्ट सेंच्युरी मॅन

अंतिम सामन्यात २३ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटनं या लीग स्पर्धेतील सर्वात जलद शतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तो खेळाडू म्हणजे मिचेल ओवन. होबार्ट हेरीकेन्सचा जबरा फॅन ते या संघाचा खेळाडू होऊन चॅम्पियनचा रुबाब मिळवणाऱ्या युवा क्रिकेटरची स्टोरीच एकदम भारी आहे. होबार्ट हेरीकेन्स संघानं पहिली वहिली ट्रॉफी जिंकल्यावर २०१५ च्या हंगामात या संघाला चीयर करायला येणाऱ्या एका छोट्या चाहत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मिचेल ओवनचा. कधीकाळी तो ज्या संघाला चीअर करण्यासाठी यायचा त्या संघाला आज त्यानं जलद शतकी खेळी करून चॅम्पियन केले आहे.   

मिचेल ओवेन याची विक्रमी सेंच्युरी

बीग बॅश लीगच्या फायनल लढतीत होबार्टच्या ताफ्यातील मिचेल ओवेन याने तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक साजरे केल्यावर त्याने ३९ चेंडूत शतकाला गवसणी घातली. बीबीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात जलद शतकी खेळी ठरली. त्याने ४२ चेंडूत ६ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १०८ धावांची खेळी केली.  

आयपीएलमध्ये एन्ट्री होणार का?

बीबीएल २०२४-२५ च्या हंगामात सर्वाधिक ४५२ धावा करत या युवा क्रिकेटपटूनं ऑस्ट्रेलियन संघाचे दार ठोठावले आहे. एवढेच नाही तर जगातील लोकप्रिय स्पर्धा असलेल्या आयपीएल संघ मालकांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या असतील. एखाद्या दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात त्याची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली तर नवल वाटणार नाही. कारण याआधी जेक फ्रेझर-मॅकगर्क याला तशी संधी मिळाली आहे. आता बीबीएल चॅम्पियन खेळाडूचं नशीबही उघडणार का? ते पाहण्याजो असेल.

Web Title: Mitchell Owen Record Fastest Century Hobart Hurricanes Win BBL Title 1st Time Fan Turned-Player Set for Australia Call Up X Factor Replacement in IPL 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.