इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनआधी ( IPL 2022 Mega Auction) दमदार कामगिरी करून आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. १२ व १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे मेगा ऑक्शन होणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) माजी सहकारी व न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनर ( Mitchell Santner) यानं फलंदाजीत धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे. न्यूझीलंडमधील सुपर स्मॅश ( Super Smash Final) ट्वेंटी-२० लीगच्या अंतिम सामन्यात सँटनरनं फलंदाजीत कमाल दाखवताना संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर नॉर्दर्न डिस्ट्रिक्स ( Northern Districts) संघानं ५६ धावांनी कँटेरबरी ( Canterbury) संघाला नमवून जेतेपद पटकावले.
प्रत्युत्तरात कँटेरबरी संघ १८.१ षटकांत १६१ धावांवर तंबुत परतला. मॅट हेन्रीनं २२ चेंडूंत ४४ धावांची खेळी केली. टीम साऊदी व इश सोढी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. सँटनरनेही एक विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्सनं रवींद्र जडेजा ( 16 कोटी), महेंद्रसिंग धोनी ( 12 कोटी), ऋतुराज गायकवाड( 6 कोटी) , मोईन अली ( 8 कोटी) यांना आयपीएल २०२२ साठी संघात कायम राखले आहे.