New Zealand beat Netherlands, World Cup 2023: न्यूझीलंड संघाने भारतात सुरू असलेल्या विश्वचषक 2023 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. हैदराबादमधील विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभव केला. याआधी, किवी संघाने गतविजेत्या इंग्लंडचा पहिल्या सामन्यात 9 विकेट्सने पराभव केला होता. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 7 विकेट गमावत 322 धावा केल्या. न्यूझीलंडकडून विल यंगने सर्वाधिक 70 धावा केल्या. कर्णधार टॉम लॅथमने 53 आणि राचिन रवींद्रने 51 धावांची खेळी केली. तर कॉनवेने 32 आणि सँटनरने नाबाद 36 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 46.3 षटकात 223 धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या मिचेल सँटनरने सर्वाधिक ५ बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करताना विल यंग, राचिन रवींद्र आणि टॉम लॅथम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने ७ बाद ३२२ धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर आणि फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडने यंग (80 चेंडूत 70 धावा) आणि रावींद्र (51 चेंडूत 51 धावा) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून एक चांगला मंच तयार केला. अखेर कर्णधार टॉम लॅथमने 46 चेंडूत 53 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेली. डावाच्या सुरुवातीला नेदरलँडच्या गोलंदाजांनी तीन मेडन षटके टाकली होती. यंगने चौथ्या षटकात रायन क्लेनच्या चेंडूवर दोन चौकार मारून न्यूझीलंडचे खाते उघडले. त्यानंतर डाव पुढे गेला आणि तीनशेपार पोहोचला. इंग्लंडविरुद्धचा शतकवीर रवींद्र आणि यंगने चांगली धावगती राखली. अर्धशतके पूर्ण केल्यानंतर यंग आणि रवींद्र बाद झाले. त्यानंतर मिचेल सँटनरने १७ चेंडूंत ३६ धावांची नाबाद खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडला तीनशेपार मजल मारता आली.
प्रतुत्तरात नेदरलँड्सकडून कॉलीन एकरमनने सर्वाधिक ६९ धावा केल्या. त्याच्या खेळीत ५ चौकारांचा समावेश होता. त्याखालोखाल स्कॉट एडवर्ड्सने ३० तर एंजलब्रेचने २९ धावा केल्या इतर खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही. न्यूझीलंडकडून मात्र सँटनरने ५ बळी टिपले.
Web Title: Mitchell Santner shines with fifer as New Zealand beat Netherlands by 99 Runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.