दुबई : ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेश स्टार्क मंगळवारी झालेल्या आयपीएल २०२४च्या मिनी लिलावात भाव खाऊन गेला. २ कोटी मूळ किंमत असलेल्या या ३३ वर्षांच्या खेळाडूला केकेआरने तब्बल २४.७५ कोटी रुपये खर्चून स्वत:च्या संघात घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि गोलंदाजीचा जोडीदार पॅट कमिन्स याला मागे टाकले. स्टार्क हा २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू बनला.
वेगवान गोलंदाजांवर लिलावात अधिक भर दिसला. सनरायझर्स हैदराबादने कमिन्सला २०.५० कोटी मोजले. आश्चर्याची बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या वेगवान त्रिकुटापैकी एक जोश हेजलवूड याला मात्र कुणीही संघात घेतले नाही. त्याची बेस प्राइस २ कोटी होती. कमिन्सने आजच्या लिलावात इंग्लंडच्या सॅम करनला मागे टाकले. मागच्या सत्रात करनला पंजाब संघाने १८.५० कोटींत खरेदी केले होते. कमिन्सशिवाय विश्वचषकाच्या फायनलचा हिरो ट्रॅव्हिस हेड याला हैदराबादने ६ कोटी ८० लाखांत घेतले. अन्य वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल (११.७५ कोटी - पंजाब किंग्स), अल्झारी जोसेफ (११.५० कोटी - आरसीबी), उमेश यादव (५.८० कोटी - गुजरात) आणि शिवम मावी (६.४० कोटी लखनौ) यांना मोठी रक्कम मिळाली. न्यूझीलंडचा फलंदाज रचिन रवींद्रला सुपरकिंग्सने १ कोटी ८० लाख रुपयांत स्वत:कडे घेतले. त्याची मूळ किंमत ५० लाख होती.
ऑस्ट्रेलियाचा वार्षिक करार
१२ कोटी ५० लाख
संघ : केकेआर, किंमत : २४ कोटी ७५ लाख
आंतरराष्ट्रीय टी-२० : ५८ सामने, ७३ बळी.
आयपीएल : २०१४ आरसीबी, २०२० केकेआर.
२७ सामने, ३४ बळी. उत्कृष्ट : ४/१५
वि. पंजाब २०१५.
आंतरराष्ट्रीय खेळाडू
खेळाडू किंमत संघ
१. मिचेल स्टार्क २४ कोटी ७५ लाख कोलकाता नाइट रायडर्स
२. पॅट कमिन्स २० कोटी ५० लाख सनरायजर्स हैदराबाद
३. डॅरिल मिचेल १४ कोटी चेन्नई सुपरकिंग्स
४. हर्षल पटेल ११ कोटी ७५ लाख पंजाब किंग्स
५. अल्झारी जोसेफ ११ कोटी ५० लाख रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
अनकॅप्ड भारतीय खेळाडू
खेळाडू किंमत संघ
१. समीर रिझवी ८ कोटी ४० लाख चेन्नई सुपरकिंग्स
२. शाहरुख खान ७ कोटी ४० लाख गुजरात जाएंट्स
३. कुमार कुशाग्र ७ कोटी २० लाख दिल्ली कॅपिटल्स
४. शुभम दुबे ५ कोटी ८० लाख राजस्थान रॉयल्स
५. यश दयाल ५ कोटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आयपीएल संघांची खरेदीत समजदारी
चेन्नई सुपर किंग्ज
धोनी, कॉन्वे, गायकवाड, रहाणे, जडेजा, सँटनर, मोईन, शिवम, निशांत सिंधू, अजय मंडल, हंगरगेकर, चाहर, चोखा, चोखंद, मुशीकर, शेख रशीद, सिमरजीत सिंग, तुषार देशपांडे, पाथीराना.
नवे चेहरे : रचिन रवींद्र १.८० कोटी (मूळ किंमत किंमत ५० लाख) शार्दूल ठाकूर ४ कोटी (मूळ किंमत २ कोटी), डेरिल मिशेल १४ कोटी (मूळ किंमत १ कोटी), समीर रिझवी ८.४० कोटी (मूळ किंमत २० लाख)
गुणांकण : रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल या योग्य खेळाडूंची खरेदी. शिवाय समीर रिझवी उपयोगाचा ठरू शकतो.
मुंबई इंडियन्स
हार्दिक, रोहित, ब्रेविस, सूर्यकुमार, किशन, तिलक, टिम डेव्हिड, विष्णू, अर्जुन, मुलानी, वढेरा, बुमराह, कार्तिकेय, पीयूष, मधवाल, कार्तिकेय व शेफर्ड.
नवे चेहरे : गेराल्ड कोएत्झी ५ कोटी (मूळ किंमत २ कोटी), दिलशान मधुशंका ४.६० कोटी (मूळ किंमत ५० लाख), श्रेयस गोपाल (मूळ किंमत २० लाख).
गुणांकन : कोएत्झी आणि मधुशंका यांच्या समावेशाने गोलंदाजी मजबूत. मात्र अजून आश्वासक चेहऱ्यांची गरज होती.
गुजरात टायटन्स
गिल, मिलर, वेड, साहा, विल्यमसन, अभिनव, सुदर्शन, नळकांडे, शंकर, यादव, तेवतिया, शमी, अहमद, साई किशोर, राशिद, लिटल आणि मोहित.
नवे चेहरे : अब्दुल्ला ओमरझाई ५० लाख (मूळ किंमत ५० लाख), उमेश यादव ५.८० कोटी (मूळ किंमत २ कोटी), शाहरुख खान ७.४० कोटी, सुशांत मिश्रा २ कोटी २० लाख, कार्तिक त्यागी ६० लाख, मानव सुतार २० लाख.
गुणांकन : उमेश यादव आणि शाहरुख खान हे भारतीय खेळाडू मॅचविनर ठरू शकतात. तसेच अब्दुल्ला ओमरझाई कमाल करू शकतो.
कोलकाता नाइट रायडर्स
श्रेयस, नितीश, रिंकू, गुरबाज, जेसन, अनुकूल, रसेल, व्यंकटेश, सुयश, हर्षित, नरेन, वैभव आणि चक्रवर्ती.
नवे चेहरे : मिचेल स्टार्क २४.७५ कोटी (मूळ किंमत २ कोटी), केएस भारत ५० लाख (मूळ किंमत ५० लाख), चेतन साकरिया ५० लाख (मूळ किंमत ५० लाख), अंगकृष्ण रघुवंशी २० लाख (मूळ किंमत २० लाख), रमणदीपसिंग २० लाख.
गुणांकन : मिचेल स्टार्कवर गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केले. त्यामुळे इतर चांगल्या खेळाडूंना घेता आले नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
डू प्लेसिस, पाटीदार, विराट, अनुज, कार्तिक, प्रभुदेसाई, जॅक, मॅक्सवेल, लोमरोर, करण, भंडगे, आकाशदीप,सिराज, टॉपले, राजनकुमार, हिमांशू, विजयकुमार, ग्रीन आणि मयंक डागर.
नवे चेहरे : अल्झारी जोसेफ ११.५० कोटी (मूळ किंमत १ कोटी), यश दयाल ५ कोटी
गुणांकन : अल्झारी आणि यश दयालसाठी इतके पैसे मोजणे हास्यास्पद. गोलंदाजी कमकुवत.
सनरायझर्स हैदराबाद
मार्कराम, समद, त्रिपाठी, फिलिप्स, मयंक, क्लासेन, अनमोलप्रीत, उपेंद्र, नितीश, अभिषेक, यान्सेन, वॉशिंग्टन, सनवीर, भुवनेश्वर, फारुखी, नटराजन, उमरान, मार्कंडे, शाहबाज.
नवे चेहरे : ट्रॅव्हिस हेड ६.८० कोटी (मूळ किंमत २ कोटी), वानिंदू हसरंगा १.५० कोटी (मूळ किंमत १.५० कोटी), पॅट कमिन्स २०.५० कोटी (मूळ किंमत २ कोटी), जयदेव उनाडकट १.६० कोटी (मूळ किंमत ५० लाख), आकाशसिंग २० लाख.
गुणांकन : पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड आणि वानिंदू हसरंगा हे स्मार्ट बाॅय. कमिन्स कर्णधार म्हणून परिणामकारक ठरू शकतो.
दिल्ली कॅपिटल्स
पंत, वॉर्नर, पृथ्वी, धुल, पोरेल, अक्षर, ललित, मार्श, प्रवीण, ओस्तवाल, नॉर्खिया, कुलदीप, एन्गिडी, खलील, इशांत, मुकेश.
नवे चेहरे : हॅरी ब्रूक ४ कोटी (मूळ किंमत २ कोटी), ट्रिस्टन स्टब्स - ५० लाख (मूळ किंमत ५० लाख), कुमार कुशाग्र ७.२० कोटी, रसिक दर २० लाख, विक्की भूई २० लाख.
गुणांकन : दिग्गजांऐवजी नव्या चेहऱ्यांना पसंती. मात्र, अनुभवी खेळाडू घेता आला असता.
पंजाब किंग्स
शिखर, जितेश, बेअरस्टो, प्रभसिमरन, लिव्हिंगस्टोन, तायडे, ऋषी,करन, सिकंदर, शिवम, हरप्रीत, अर्शदीप, रबाडा, एलिस, चहर, करियप्पा, हरप्रीत.
नवे चेहरे : हर्षल पटेल ११.७५ कोटी (मूळ किंमत २ कोटी), ख्रिस वोक्स ४.२० कोटी (मूळ किंमत २ कोटी)
गुणांकन : अष्टपैलू खेळाडूची खरेदी करता आली असती. हर्षलवर गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च.
लखनौ सुपर जायंट्स
राहुल, डी कॉक, पूरन, बदोनी, हुडा, कृष्णप्पा, कृणाल, मेयर्स, स्टॉयनिस, मंकड, युद्धवीर, वुड, मयंक, मोहसीन, बिश्नोई, यश, मिश्रा, नवीन, पडिक्कल.
नवे चेहरे : शिवम मावी ६.४ कोटी (मूळ किंमत ५० लाख), एम. सिद्धार्थ २.४० कोटी, अर्शीन कुलकर्णी २० लाख (मूळ किंमत २० लाख)
गुणांकन : अनुभवी वेगवान गोलंदाज घेण्यात लखनऊचा संघ अपयशी ठरला.
राजस्थान रॉयल्स
सॅमसन, बटलर, हेटमायर, यशस्वी, जुरेल, रियान,फरेरा, क्रुणाल, अश्विन, सेन, नवदीप, संदीप, बोल्ट, युझवेंद्र, झम्पा, प्रसिद्ध, आवेश.
नवे चेहरे : रोवमन पॉवेल ७.४० कोटी (मूळ किंमत १ कोटी), शुभम दुबे ५.८० कोटी (मूळ किंमत २० लाख), टॉम कोहलर ४० लाख.
गुणांकन : स्मार्ट खरेदी करण्यात राजस्थान अपयशी. पॉवेलला जास्त पैसे दिले.
Web Title: Mitchell Starc becomes the most expensive player; Fast bowlers dominate IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.