Mitchell Starc Holds A Shameful Record Bowled Most Expensive Over In ODI : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा वनडे सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघावर १८६ धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर इंग्लंडच्या डावातील अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) तर एवढी धुलाई झाली की, त्याच्या नावे लाजिरवण्या विक्रमाची नोंद झाली. अखेरच्या षटकात त्याने २८ धावा खर्च केल्या.
स्टार्कची धुलाई, स्टार गोलंदाजानं टाकलं वनडेतील महागडं षटक
इंग्लंडच्या डावातील अखेरच्या षटकात लायम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone) याने तुफान फटकेबाजी करत स्टार्कला चोप चोप चोपलं. त्याच्या षटकात इंग्लंडच्या स्फोटक बॅटरनं ४ षटकार आणि एका खणखणीत चौकारासह २८ धावा ठोकल्या. मिचेल स्टार्कचे हे षटक ऑस्ट्रेलियाकडून वनडेतील आतापर्यंतचे सर्वात महागडे षटक ठरले. याआधी ऑस्ट्रेलियाकडून सर्वात महागडे षटक हे जेव्हियर डोहर्टी याने फेकले होते. २०१३ मध्ये त्याने एका षटकात २६ धावा खर्च केल्या होत्या. त्याच्याशिवाय कॅमरून ग्रीन आणि अॅडम झम्पा या दोघांनी एका षटकात प्रत्येकी २६-२६ धावा खर्च केल्या आहेत. मात्र आता क्रिकेटच्या पंढरीत टाकलेल्या महागड्या षटकानंतर हा लाजिरवाणा विक्रम मिचेल स्टार्कच्या नावे झाला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून वनडेत सर्वात महागडे षटक टाकणारे गोलंदाज
- २८ धावा - मिचेल स्टार्क विरुद्ध इंग्लंड, लॉर्ड्स, २०२४
- २६ धावा - जेव्हेयर डोहर्टी विरुद्ध भारत, बंगळुरु, २०१३
- २६ धावा - कॅमरून ग्रीन विरुद्ध भारत, इंदुर , २०२३
- २६ धावा - अॅडम झम्पा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सेंच्युरीयन, २०२३
ऑल ओव्हर फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वात महागडे षटक टाकणारे गोलंदाज
- ३० धावा- ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध भारत (टी-२० आय, २०२३)
- २९ धावा- मिचेल स्टार्क- विरुद्ध भारत (टी-२० आय, २०२४)
- २८ धावा- मिचेल स्टार्क- विरुद्ध इंग्लंड (वनडे, २०२४)
- २७ धावा- ब्रेट ली विरुद्ध वेस्ट इंडीज (टी-२० आय, २००९)
सामन्यात काय घडलं?
पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामना ३९-३९ षटकांचा खेळवण्यात आला. इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३१२ धावा ठोकल्या होत्या. कर्णधार हॅरी ब्रूकसह या सामन्यात लियाम लिविंगस्टोन धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश केला. ब्रूकनं ५८ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. दुसरीकडे लायम लिविंगस्टोन याने २७ चेंडूत नाबाद ६२ धावा कुटल्या. त्याच्या खेळीत ३ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. इंग्लंडने दिलेल्या ३१३ धावांचा पाठलागकरताना ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ धावांत आटोपला. ण
Web Title: Mitchell Starc Holds A Shameful Record Bowled Most Expensive Over In The History Of Australia ODI Cricket Check 5 most expensive overs bowled by Australians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.