Join us  

Mitchell Starc नं पाक विरुद्ध काढला शाहरुखच्या संघानं रिटेन न केल्याचा राग (VIDEO)

स्टार्कनं १० षटकांच्या आपल्या कोट्यातील ४४ चेंडू टाकले निर्धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 1:02 PM

Open in App

AUS vs PAK Mitchell Starc Fiery Spell Video : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला वनडे सामना खेळवण्यात येत आहे. ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघान बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तान संघाची अवस्था अगदी बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. कांगारुंच्या ताफ्यातील स्टार जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांची अक्षरश: भंबेरी उडाली. 

एकही धाव न खर्च करता खात्यात जमा केली पहिली विकेट

मिचेल स्टार्क पहिल्या षटकापासून जबरदस्त गोलंदाजी करत पाकिस्तान फलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले. पहिले षटक निर्धाव टाकल्यावर त्याने दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर पाकचा सलामीचा बॅटर सईम आयूब याला बोल्ड केले. स्टार्कनं टाकलेला अप्रतिम चेंडू बॅटची कड घेऊन स्टंपवर कधी आदळला ते आयूबला कळलंही नाही. एकही रन न देता स्टार्कनं पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली.  

उसळत्या चेंडूवर पाकच्या दुसऱ्या सलामीवीराचा काढला काटा 

त्यानंतर आपल्या वैयक्तिक चौथ्या षटकात स्टार्कनं उसळत्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकच्या रुपात दुसरी विकेट आपल्या खात्यात जमा केली. जोश इंग्लिशनं विकेटमागे कोणतीही चूक न करता शफीकचा सुंदर कॅच पकडला. पाकच्या या फलंदाजाने २६ चेंडूत १२ धावा केल्या. मिचेल स्टार्कनं बॅटिंग पावरप्लेमध्ये ५ षटके  गोलंदाजी केली. यात त्याने फक्त ११ धावा खर्च केल्या. याशिवाय शाहिन शाह आफ्रिदीला बोल्ड  करत स्टार्कनं या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. १० षटकात ३ निर्धाव षटकासह ३३ धावा खर्च  केल्या.  यात ६० पैकी ४४ चेंडूत त्याने एकही धाव दिली नाही.  

पाकवर निघाला IPL मध्ये रिटेन न केल्याचा राग?  

आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ऑस्ट्रेलियन मिटेल स्टार्कसाठी २४.७५ कोटी एवढी विक्रमी बोली लावली होती. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील तो सर्वात महागडा खेळाडूही ठरला. पण २०२५ च्या हंगामाआधी झालेल्या रिटेन रिलीजच्या खेळात शाहरूखच्या केकेआर संघानं त्याला नारळ दिल्याचे पाहायला मिळाले. याच गोष्टीचा राग त्याने पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात काढल्याचा सीन इथं क्रिएट झाल्याचे दिसून येते.  

 

  

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तानआयसीसी