Join us  

Border-Gavaskar Trophy: भारताविरूद्धच्या पहिल्या 'कसोटी'ला ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मुकणार; तरीही म्हणतो...

IND vs AUS, Mitchell Starc injury: भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा झटका बसला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 12:36 PM

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. मात्र, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिल्याच कसोटीला ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मुकणार आहे. मिचेल स्टार्क दुखापतीमुळे पहिली कसोटी खेळणार नाही, त्यामुळे मालिकेच्या तोंडावर कांगारूच्या संघाला मोठा झटका बसल्याचे बोलले जात आहे. अलीकडेच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान तो जखमी झाला होता. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अवॉर्ड्स दरम्यान, जेव्हा होस्टने स्टार्कला दुखापतीच्या अपडेटबाबत विचारले, तेव्हा 33 वर्षीय क्रिकेटर म्हणाला, "मी ट्रॅकवर आहे... पण अजून काही आठवडे लागतील आणि नंतर कदाचित दिल्लीतील खेळाडूंना भेटेन. आशा आहे की पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर तिथे सरावाला लागेन." 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार, ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, धर्मशाला
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 

ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा
Open in App