Join us  

आता आमचे लक्ष्य ट्वेंटी-२0 वर्ल्डकप : मिताली राज

गेल्या १८ वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची मुख्य आधारस्तंभ बनलेल्या मिताली राज हिने अजून निवृत्तीचा विचार केला नसल्याचे सांगत फॉर्म आणि फिटनेस राहिला तर पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे संकेत दिले आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 2:34 AM

Open in App

नवी दिल्ली : गेल्या १८ वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेट संघाची मुख्य आधारस्तंभ बनलेल्या मिताली राज हिने अजून निवृत्तीचा विचार केला नसल्याचे सांगत फॉर्म आणि फिटनेस राहिला तर पुढील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, सध्या आपले लक्ष्य पुढील वर्षी वेस्ट इंडिजमध्ये होणाºया ट्वेंटी-२0 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे असल्याचे राज हिने सांगितले.इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळवणाºया भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी पन्नास लाख रुपये देऊनसन्मानित केले. या वेळी मितालीने आपल्या भविष्यातील योजनेविषयी भाष्य केले.मिताली म्हणाली, विश्वचषक स्पर्धेपूर्वी आम्ही फायनलपर्यंत धडक मारू असे कोणालाही वाटले नव्हते. परंतु आमची तयारी चांगली झाली होती. स्पर्धेपूर्वी आम्ही काही महत्त्वपूर्ण मालिका खेळल्या होत्या, त्यासाठी मी बीसीसीआयचे आभार मानते. मला माझ्या सहकारी खेळाडूंचा अभिमान आहे. त्यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. सहयोगी स्टाफची भूमिकाही महत्त्वाची होती. परिस्थिती कशीही असली तरी ते ड्रेसिंग रूममधील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवत होेते. आम्ही कुटुंबासारखे राहिलो व त्यामुळे मैदानावर चांगली कामगिरी करू शकलो.बीसीसीआयचे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख आणि सहयोगी स्टाफला प्रत्येकी २५ लाखांचे बक्षीस देऊन सन्मानित केले.या वेळी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, एकेकाळी फकत पुरुषांच्या क्रिकेटची चर्चा केली जात होती; परंतु आता काळ बदलला आहे. महिला संघाच्या या यशामुळे देशातील सामान्य महिलांचाही आत्मविश्वास वाढेल. भारतीय संघातील १५ पैकी दहा खेळाडू रेल्वेमध्ये कार्यरतआहेत. त्यांना यापुढेही सहकार्यमिळत राहील, रेल्वेतील त्यांचे करिअर सुरक्षित असल्याची ग्वाही प्रभू यांनी या वेळी दिली.या वेळी बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी, खजिनदारअनिरुद्ध चौधरी, प्रशासक समितीचे सदस्य डायना एडुल्जी, सीईओराहुल जौहरी आणि आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला आदी या वेळी उपस्थित होते.मोदींनी खेळाडूंना सांगितले योगासनाचे महत्त्वपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले. या वेळी मोदी म्हणाले की, देशाचा नावलौकिक करणाºया इतर महिलांप्रमाणेच तुम्हीसुद्धा भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या वेळी खेळाडूंनी दबावाबद्दल विचारले असता त्यांनी योगासनचे महत्त्व पटवून देत सांगितले की, योगासनामुळे मानसिकव शारीरिक संतुलन कायम राहण्यास व अनासक्ती मिळविण्यास मदत होते.क्रीडामंत्र्यांकडून गौरवबेटी बचाओ, बेटी पढाओ और बेटी खिलाओ, असा नवीन संदेश क्रीडामंत्री विजय गोएल यांनी दिला. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी करणाºया भारतीय महिला संघाचा मंत्री गोएल यांनी गुरुवारी येथे गौरव केला.आश्विनचा व्हिडीओ पाहून शिकले : दीप्तीभारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हिने या स्पर्धेत वेळोवेळी कॅरम बॉलचा उपयोग केला. हा चेंडू टाकण्याची कला तिने भारतीय पुरुष संघातील फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनचा व्हिडीओ पाहून याचा सराव केला. मी हा चेंडू टाकतानाचे आश्विनचे व्हिडिओ पाहिले. त्याची चेंडू पकडण्याची पद्धत, गोलंदाजी अ‍ॅक्शन आणि चेंडू सोडण्याची ढब याचे मी बारकाईने निरीक्षण केले. पुरुषांसाठी २00८मध्ये आयपीएल सुरु झाले तेव्हाच महिलांसाठीही सुरु व्हायला हवे होते. अजूनही वेळ गेलेली नाही. भारतीय महिला क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी हे गरजेचे आहे, कारण अन्य देश यादृष्टीने वाटचाल करीत आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अजून मला नोकरीबाबत कोणतीही आॅफर दिलेली नाही; परंतु लवकरच काहीतरी घोषणा होईल अशी आशा आहे.-दीप्ती शर्माआयपीएलमुळे अनेक परदेशी खेळाडू भारतात येतील, त्यांच्यासोबत खेळण्याचा आम्हाला अनुभव मिळेल. यामुळे देशातील उदयोन्मुख खेळाडूंची ओळख होईल आमची बेंच स्ट्रेंथ मजबूत होईल. पाकिस्तानविरुद्ध भारताला विजय मिळवून देण्यास मोठा वाटा उचलला होता. परंतु या स्पर्धेचा अंतिम सामना खेळू न शकल्याचे दु:ख आहे. संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाचा मी सन्मानच करते. परंतु संघ संयोजन करताना काही तडजोडी कराव्या लागतात. अंतिम सामना ही फार मोठी संधी असते.- एकता बिष्टमला आणि स्मृती मानधनाला बिग बॅश लीग खेळण्याचा मोठा फायदा झाला. भविष्यात आणखी काही खेळाडू अशा प्रकारच्या लीगशी जोडले जातील. जर महिलांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर युवा खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल. अशा प्रकारची लीग अत्यंत गरजेची आहे.-हरमनप्रीत कौर