Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

12 फेब्रुवारीपासून भारतातील क्रिकेट चाहते आयपीएल लिलाव 2022 च्या बातम्यांमध्ये मग्न होते, त्यामुळे मितालीच्या विक्रमाची कुठेही चर्चा झाली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:46 PM2022-02-15T14:46:47+5:302022-02-15T14:46:55+5:30

whatsapp join usJoin us
Mithali Raj News| Mithali Raj breaks Sachin Tendulkar's record; Became the first cricketer to play ODI cricket for the longest time | Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मिताली राज हे भारतीय क्रिकेटचे मोठे नाव आहे. पदार्पणाच्या सामन्यात शतक, सर्वात कमी वयात शतक, सर्वाधिक धावा असे अगणित विक्रम मिलाली राजच्या नावे आहेत. यातच आता अजून एका नवीन विक्रमाची तिच्या नावावर नोंद झाली आहे. मितालीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

ज्या विक्रमासाठी सचिन तेंडुलकरला 22 वर्षांहून अधिक काळ लागला, असा एक मोठा विक्रम मिलाने मोडला आहे. मिताली आता सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू बनली आहे. 12 फेब्रुवारीपासून भारतातील क्रिकेट चाहते आयपीएल लिलाव 2022 च्या बातम्यांमध्ये मग्न होते, त्यामुळे मितालीच्या विक्रमाची कुठेही चर्चा झाली नाही. या काळात मिताली राजने 12 फेब्रुवारीला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरुन 22 वर्षे 231 दिवसांची कारकिर्द पूर्ण केली. असा विक्रम करणारी ती पृथ्वीवरील पहिली व्यक्ती बनली आहे. 

याआधी पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये प्रदीर्घ कारकिर्दीचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनची वनडे कारकीर्द 22 वर्षे 91 दिवसांची आहे. पण मितालीने आता सचिनला मागे टाकले आहे. आता फक्त सचिनच्या नावावर पुरूष क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम  आहे. सचिनने पहिला वनडे सामना 18 डिसेंबर 1989 रोजी आणि शेवटचा वनडे सामना 12 मार्च 2012 रोजी खेळला होता.

Web Title: Mithali Raj News| Mithali Raj breaks Sachin Tendulkar's record; Became the first cricketer to play ODI cricket for the longest time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.