मुंबई : भारतीय महिला संघातील अनुभवी फलंदाज मिताली राजने बुधवारी विक्रमाला गवसणी घातली. भारत A आणि ऑस्ट्रेलिया A यांच्याली ट्वेंटी-20 सामन्यात मितालीने शतकी खेळी साकारताना भारताच्या विजयाचा पाया रचला. तिच्या या शतकाच्या जोरावर भारत A संघाने 20 षटकांत 5 बाद 184 धावांचे लक्ष्य उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या महिलांना 20 षटकांत 9 बाद 156 धावांवरच समाधान मानावे लागले.
मितालीने 61 चेंडूंत 18 चौकार आणि 1 षटकार खेचताना नाबाद 105 धावांची खेळी केली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरने 57 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. तिनेही 32 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार खेचले. ऑस्ट्रेलिया A संघाच्या तहलीया मॅक्ग्राथने ( 47) एकाकी झुंज दिली.
मितालीने शतकी खेळीसह दोन विक्रम नावावर केले. भारताकडून ट्वेंटी-20 महिला क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीचा विक्रम मितालीच्या नावावर नोंदवला गेला. स्मृती मानधनाने याच वर्षी वेस्टर्न स्ट्रॉर्म क्लबकडून 102 धावा केल्या होत्या. त्याशिवाय ट्वेंटी-20 प्रकारात दोन शतक करण्याचा मानही मितालीने पटकावला. यापूर्वी 2017-18 च्या हंगामात रेल्वेकडून खेळताना नाबाद 100 धावा केल्या होत्या.
Web Title: Mithali Raj scored a century, creat two records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.