Join us  

Ravindra Jadeja Joined BJP : रवींद्र जडेजाची राजकारणात एन्ट्री! आमदार पत्नी रिवाबाने दिली माहिती

टीम इंडियाचा खेळाडू रवींद्र जडेजाने राजकीय इनिंग सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 2:05 PM

Open in App

Ravindra Jadeja BJP : पत्नी पाठोपाठ आता जड्डू देखील राजकीय खेळी करण्यासाठी सज्ज आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानेराजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिने एका पोस्टद्वारे सांगितले की, रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

जड्डू अनेकदा पत्नी रिवाबासोबत निवडणुकीच्या प्रचारात दिसला आहे. त्यांनी अनेक रोड शो देखील केले आहेत. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजाने भाजपचे सदस्यत्व घेतले आहे. रिवाबाने पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली की, रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे. खरे तर ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

टॅग्स :रवींद्र जडेजाभारतीय क्रिकेट संघराजकारणऑफ द फिल्डभाजपा