रहाणेची चिकाटी! 'अजिंक्य'ची भारतीय संघात एन्ट्री अन् राजकारण्यांसह चाहत्यांचा जल्लोष

wtc final 2023 india squad : अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 01:42 PM2023-04-25T13:42:48+5:302023-04-25T13:43:14+5:30

whatsapp join usJoin us
 MLA Satyajit Tambe has congratulated Ajinkya Rahane on his place in the Indian squad for the final of the World Test Championship 2023  | रहाणेची चिकाटी! 'अजिंक्य'ची भारतीय संघात एन्ट्री अन् राजकारण्यांसह चाहत्यांचा जल्लोष

रहाणेची चिकाटी! 'अजिंक्य'ची भारतीय संघात एन्ट्री अन् राजकारण्यांसह चाहत्यांचा जल्लोष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ajinkya rahane ipl 2023 । मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध (IND vs AUS) होणाऱ्या या सामन्यासाठी आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) संघ जाहीर केला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. रणजी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीनंतर आयपीएलमध्ये (IPL 2023) स्फोटक खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीची दखल निवड समितीने घेतली असून त्याला संधी देण्यात आली आहे. 

दरम्यान, रहाणेला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर चाहते एकच जल्लोष करत आहेत. चाहत्यांसह राजकारणी मंडळी देखील मराठमोळ्या चेहऱ्याचे अभिनंदन करत आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मित्रासाठी खास चारोळ्या लिहल्या आहेत. "माझा भाऊ अजिंक्य रहाणे चिकाटीचे उदाहरण आहे. गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि या हंगामातील आयपीएलचा जबरदस्त फॉर्म त्याच्या चारित्र्याचा पुरावा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलसाठी भारतीय कसोटी संघात त्याच्या पुनरागमनाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन", अशा शब्दांत तांबे यांनी रहाणेचे अभिनंदन केले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि लोकेश राहुल असे तीन सलामीवीर संघात असतील. तर चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर मधल्या फळीची धुरा असेल. अजिंक्य रहाणेसोबतच शार्दुल ठाकूरलाही भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची धुरा पुन्हा एकदा के.एस. भरतकडे सोपवण्यात आली आहे. तर रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल अशा तीन फिरकीपटूंना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. 

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  MLA Satyajit Tambe has congratulated Ajinkya Rahane on his place in the Indian squad for the final of the World Test Championship 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.