कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जग एकजुट झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. भारताच्या या एकजुटीचं इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन यानं कौतुक केलं आणि तेही हिंदी भाषेत. कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग थांबलं आहे. क्रीडाविश्वालाही याची झळ सहन करावी लागली आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) आणि इंग्लिश प्रीमिअर लीग ( ईपीएल) या दोन मुख्य स्पर्धाही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संपूर्ण देशाला संबोधित केले. मोदींनी प्रथमच कोरोना व्हायरस संबंधीत देशासमोर आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी 130 कोटी भारतीयांना योग्य ती काळजी घेण्याचं आणि येत्या रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झालं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, गौतम गंभीर, रवी शास्त्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, बबिता फोगाट यांच्यासह अनेकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली.
त्यात शुक्रवारी इंग्लडचा धडाकेबाज फलंदाज पीटरसन यानेही एक ट्विट केले. एका कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी पीटरसन काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आला होता. त्यानंही भारतीयांसाठी एक ट्विट केलं. तो म्हणाला,''नमस्ते इंडिया.कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. सर्वांना आपापल्या सरकारनं केलेल्या आव्हानाचं पालन करायला हवं. काही दिवसांसाठी घरीच राहा, आपली हुशारी दाखवण्याची हीच ती वेळ. तुम्हा सर्वांना खुपखुप प्रेम.'' पीटरसननं हे ट्विट हिंदीतून केलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
टोकियो ऑलिम्पिक स्थगित करणे अतिघाईचे ठरेल, थॉमस बाक
coronavirus : कोरोनामुळे संपूर्ण क्रीडाविश्व झाले ठप्प
OMG : टीम इंडियाविरुद्ध सामना खेळलेला क्रिकेटपटू Corona पॉझिटीव्ह