कर्णधार बदलताच मोईन अलीने नितृत्तीचा निर्णय घेतला मागे, पाकिस्तान दौऱ्यासाठी झाला सज्ज 

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 01:14 PM2022-06-13T13:14:16+5:302022-06-13T13:15:54+5:30

whatsapp join usJoin us
Moeen Ali confirms reversal of Test retirement ahead of Pakistan tour | कर्णधार बदलताच मोईन अलीने नितृत्तीचा निर्णय घेतला मागे, पाकिस्तान दौऱ्यासाठी झाला सज्ज 

कर्णधार बदलताच मोईन अलीने नितृत्तीचा निर्णय घेतला मागे, पाकिस्तान दौऱ्यासाठी झाला सज्ज 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. आगामी पाकिस्तान दौऱ्यासाठी तो इंग्लंड संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे. याबाबत त्याने इंग्लंडचे नवनिर्वाचीत प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम ( England new head coach, Brendon McCullum) यांच्याशी चर्चा केली.  सप्टेंबर 2021 मध्ये मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्याने 64 कसोटींत 195 विकेट्स घेतल्या, शिवाय त्याच्या नावावर पाच शतकंही आहेत. 

दरम्यान, ब्रेंडन मॅक्युलमच्या येण्याचे इंग्लंडच्या संघाने अधिका आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी वन डे मालिकेसाठी मोईऩ अली नेदरलँड्स येथून रवाना झाला आहे. ''ब्रेंडन मॅक्युलमला जेव्हा वाटेल, तेव्हा मी नक्की पाकिस्तानात खेळेन,''असे अलीने BBC सोबत बोलताना म्हटले. 2005 नंतर इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यावर मोईन अलीचा चुलत भाऊ कबीर अली हा इंग्लंडच्या संघाचा सदस्य होता. मोईन अली म्हणाला,''पाकिस्तानमध्ये प्रेम व पाठिंबा मिळतो, हे मला माहित्येय. कारण तेथील लोकं क्रिकेटवर प्रेम करतात.''

मोईन अलीने ब्रेंडन मॅक्युलमसोबत चर्चा झाल्याचे सांगितले आणि त्यानंतरच निवृत्तीचा निर्णय त्याने मागे घेतला. त्याने मॅक्युलम व बेन स्टोक्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.   

इंग्लंडचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक आणि मोईन अली यांच्यात ऑन एअर भांडण
 

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार अ‍ॅलेस्टर कूक आणि स्टार अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यात ऑन एअर भांडण झालं होतं आणि आता England vs New Zealand यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीतही त्यावरून वाद रंगल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  

चार महिन्यानंतर हे दोघं पुन्हा ऑन एअर समोरासमोर आले. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या समालोचनासाठी कूक व मोईन हे एकत्र आले. यावेळी पुन्हा जुनं भांडण उकरून काढले गेले. कूकने सुरुवात केली. तो म्हणाला, मी सुट्टीवरून परत येत होतो, मध्यरात्री सरळ स्टुडिओकडे चालत होतो. मी हसतमुख मोईनला भेटलो, तो नेहमीप्रमाणे खूप आनंदी होता. असं असलं तरी, तो प्रत्येकाला म्हणाला, 'मी खूप चांगला कर्णधार नव्हतो आणि मी खूप चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही'.  
 

Web Title: Moeen Ali confirms reversal of Test retirement ahead of Pakistan tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.