लाहोर : पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरनं स्वतःला अडचणीत टाकले आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे, असा संदेश देणाऱ्या एका ट्विटला आमीरनं LIKE केल्यानं त्याच्यावर टीका होत आहे. आमीरनं नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि त्यानं इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याच्या दृष्टीनं ब्रिटीश पासपोर्टसाठीही अर्ज केला आहे.
त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर पाकिस्तानचे माजी दिग्गज वासीम अक्रम आणि शोएब अख्तर यांनी आश्चर्य व्यक्त केले. शिवाय त्याच्या ब्रिटीश पासपोर्टसाठी केलेल्या अर्जावरही टीका होत आहे. त्याच्या याच ट्विटवर एका चाहत्यानं आमीरला दहशतवाद्यांचा देश सोडायचा असेल, अशी प्रतिक्रीया दिली. त्याला आमीरनेही लाईक केले, परंतु टीका होताच त्यानं चूक सुधारली.
आमिरने पळ काढला; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची बोचरी टीकावसीमने म्हणटले की, आमिरच्या निवृत्तीचे मला आश्चर्य वाटते, कारण वयाच्या २७-२८ व्या वर्षीच तुमची खरी परीक्षा असते. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन व इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला आमिरची गरज होती असे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे शोएब अख्तर म्हणाला की, मोहम्मद आमिरने वयाच्या २७ वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. मग, हसन अली व वहाब रियाजचं काय असा प्रश्न उपस्थित केला.