Join us

अल्लाह तुझं रक्षण करो; इंग्लंड दौऱ्यावर निघालेल्या पाकिस्तानी खेळाडूसाठी पत्नीनं लिहिली भावनिक पोस्ट

शोएब मलिकसह आणखी 1-2 खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणे बाकी आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 16:59 IST

Open in App

पाकिस्तानचे खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. तीन कसोटी व तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीर हा त्यापैकी एक आहे. पत्नी गर्भवती असल्यामुळे सुरुवातीला आमीरनं या दौऱ्यातून माघार घेतली होती. त्याच्या घरी नन्ही परी जन्माला आली आहे. आता त्यानं इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) कळवले आणि त्यानंतर त्याची कोरोना चाचणी झाली.  

Love Story; हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी सोडलं पाकिस्तान अन् बनला यशस्वी क्रिकेटपटू!

कोरोना चाचणीतील त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आणि त्याचा इंग्लंडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. इंग्लंडला रवाना होणाऱ्या आमीरसाठी पत्नी नर्जीसनं भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिले की,''तुझा प्रवास सुखकर होऊदे. अल्लाहचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असू दे आणि वाईट गोष्टींपासून तुझे तो नेहमी रक्षण करू दे. मी, मीन्सा आणि जोया तू परत येईपर्यंत तुझ्यासाठी प्रार्थना करू.''( पाकिस्तानी क्रिकेटपटूनं ब्रिटनमध्ये जन्मलेल्या मुलीशी केलंय लग्न; घरी आली नन्ही परी! आमीर आज इंग्लंडमध्ये दाखल होईल आणि त्यानंतर पाच दिवस सेल्फ आयसोलेशन होणार आहे. त्यानंतर पुन्हा दोन वेळा कोरोना चाचणी केली जाईल. आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडमध्ये तो तीन ट्वेंटी-20 सामने खेळेल. ते अनुक्रमे 28 व 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होतील.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 रद्द करणं बीसीसीआयला परवडलं नसतं, जाणून घ्या का ? 

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का! 

IPL 2020 ची फायनल 8 नोव्हेंबरला; जाणून घ्या भारतीय खेळाडू UAEला कधी होणार रवाना

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

Video : प्रत्येक वेळी जिंकणं महत्त्वाचं नसतं; दिव्यांग मुलीची जिद्द पाहून कराल कडक सॅल्यूट!

OMG : IPL 2020 यूएईत होणार असल्यानं मुंबई इंडियन्सची चिंता वाढली!

टॅग्स :पाकिस्तानइंग्लंड