महान फलंदाज सचिन तेंडुलकरला जगातील भलेभले गोलंदाज घाबरायचे... तेंडुलकरच्या फलंदाजीसमोर जगातील दिग्गज गोलंदाज हतबल झालेले सर्वांना पाहिले आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याच्या स्वप्नात सचिन तेंडुलकर यायचा.. अशा या महान फलंदाजाबद्दल पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मह आसीफ यानं मोठा दावा केला. 2006च्या भारताच्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करताना आसीफनं दावा केला की, त्या मालिकेत सचिन तेंडुलकरला शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर घाबरलेलं पाहिलं.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. पहिले दोन सामना अनिर्णित राहिल्यानंतर इंझमाम-उल-हकच्या पाक संघानं निर्णायक सामना 341 धावांनी जिंकून मालिका 1-0 अशी खिशात घातली. या सामन्यात भारतीय गोलंदाज इरफान पठाणनं हॅटट्रिक घेतली होती.
''2006मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाकडे तगडे फलंदाज होते. राहुल द्रविडनं मालिकेत खोऱ्यानं धावा केल्या होत्या, वीरेंद्र सेहवागनं मुल्तान कसोटीत खणखणीत आतषबाजी केली होती. फैसलाबाद कसोटीत दोन्ही संघांनी 600 धावा केल्या होत्या. भारताकडे तळालाही दमदार फलंदाज होते. महेंद्रसिंग दोनी सातव्या किंवी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला यायचा,''असे आसीफने सांगितले.
2010च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील आसीफ हा प्रमुख आरोपी होता. तिसऱ्या कसोटीत इरफान पठाणनं हॅटट्रिक घेतली असली तरी तो सामना शोएब अख्तरनं गाजवला. आसीफ म्हणाला,''सामना सुरू झाला तेव्हा इरफाननं हॅटट्रिक घेतली. आम्ही खचलो होते. पण, कामरान अकमलनं शतक झळकावून संघाची धावसंख्या 240पर्यंत नेली. त्यानंतर शोएबनं धुमाकूळ घातला. त्याच्या बाऊंसरवर सचिन तेंडुलकरला डोळे बंद करताना मी पाहीले. आम्ही भारताला 240 पार जाऊ दिले नाही.''
भारताला पहिल्या डावात 238 धावा करता आल्या आणि त्यानंतर पाकिस्ताननं 599 धावा करून भारताला 341 धावांनी हार मानण्यास भाग पाडले.
सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा