Join us  

डॉक्टर्स, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; टीम इंडियाच्या माजी कर्णधाराची मागणी

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील नागफनी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर्सवर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 12:57 PM

Open in App

कोरोना व्हायरसचे जगभरात आतापर्यंत 22लाख 51, 446 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 54,278 जणांचा मृत्यू झाला असून 5 लाख 71,359 जणं बरी झाली आहेत. भारतातील रुग्णांचा आकडा 14425 इतका झाला असून 488 जणांना प्राण गमवावे लागले आहे, तर 2045 रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना ठिक करण्यासाठी आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी डॉक्टर्स व पोलीस यंत्रणा दिवसरात्र काम करत आहे. पण, काही माथेफिरू डॉक्टर्स व पोलीसांना मारहाण करण्याच्या घटना देशात घडत आहेत. भारताच्या क्रिकेटपटूंनी अशा लोकांचा वारंवार निषेध केला आहे. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानेही अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी  उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील नागफनी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टर्सवर नागरिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि दोन पोलीस जखमी झाले होते. त्याचा अनेकांनी निषेध केला, परंतु अशा घटना वारंवार घडत आहेत. 

मोहम्मद अझरुद्दीन यानेही डॉक्टर्स व पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांचा समाचार घेतला. तो म्हणाला,'' डॉक्टर्स व पोलीस यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी. डॉक्टर स्वत: हा व्यवसाय निवडताना ते इतरांचा जीव वाचवण्याची शपथ घेतात. ते त्यांचं काम करत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर कोणी हल्ला करत असेल, तर त्याच्यावर अतिशय कठोर शिक्षा केली जायला हवी. तरच त्यांना समज येईल.'' 

यावेळी अझरनं सरकारच्या नियमांचे पालक करण्याचेही आवाहन केलं.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

बबिता फोगाटची 'तबलिगी जमात' वर वादग्रस्त पोस्ट; महाराष्ट्रात पोलीस तक्रार दाखल

बबिता फोगाटला 'Terrorist' म्हणणाऱ्यावर भडकली Jwala Gutta; म्हणाली...

Viral Video : 'शीला की जवानी' वर थिरकला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर 

MS Dhoniचा तीन वर्षांचा Future Plan ठरलाय!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय क्रिकेट संघ