आशिया चषक २०२२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एका आठवड्यात दुसऱ्यांदा सामना रंगणार आहे. टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तानला ५ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. आता दुसऱ्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ दुखापतीने त्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिजने संघ व्यवस्थापनाला अनोखा सल्ला दिला आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात नसीम शाह क्रॅम्पमुळे दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर ४ सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी शाहनवाज दहानीही दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलवर या मुद्द्यावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना महम्मद हाफिजनं अनोखा सल्ला दिला. पाकिस्तानी खेळाडूंना देशी चिकनचे इंजेक्शन दिले पाहिजे असं तो म्हणाला.
“माझं टीम मॅनेजमेंटला आवाहन आहे की सर्व खेळाडूंना देशी कोंबड्यांची इंजेक्शन्स देण्यात यावीत. खेळाडू दोन दोन सामने खेळतात आणि त्यानंतर दुखापतग्रस्त होतात. ज्या खेळाडूंबाबत ते तयार आहेत असं म्हटलं जातं, परंतु जसं ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येतात, दोन सामने खेळून त्यांचा फिटनेस खराब होतो,” असंही त्यानं सांगितलं. महम्मद हाफिजनं एका लाईव्ह शोदरम्यान असा अनोखा सल्ला दिला. त्यानंतर एकच हशा पिकला होता. परंतु हा हास्याचा विषय नसून टीम मॅनेजमेंटला यावर नक्कीच विचार करावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Web Title: mohammad hafeez on pakistani players fitness chicken injection india vs pakistan match asia cup 2022 live update debate show
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.