Join us  

गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह

आतापर्यंत 29 पैकी  10 खेळाडूंना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 1:21 PM

Open in App
ठळक मुद्देमंगळवारी पाकिस्तान क्रिकेट मंडळानं 7 कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंची नावं जाहीर केली होतीइंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या 29पैकी 10 खेळाडूंना कोरोनाची लागण

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) मंगळवारी त्यांचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असलेले जाहीर केलं. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानी खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यानुसार आतापर्यंत 29 पैकी  10 खेळाडूंना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झाले आहेत. पण, बुधवारी एक धक्कादायक बाब समोर आली. पीसीबीनं जाहीर केलेल्या सात कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी एकानं खासगी केंद्रात चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे पीसीबीच्या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

हैदर अली, हरीस रौफ आणि शादाब खान या तीन खेळाडूंनंतर फाखर जमान, इम्रान खान, कशीफ भट्टी, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिझवान आणि वाहब रियाझ यांना कोरोना झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. पाकिस्तानचे खेळाडू 28 जूनला इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी केलेला कोरोना चाचणीत पाकिस्तानचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांना आता 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असून पुन्हा त्यांची चाचणी करण्यात येईल. त्यांचा आहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी मिळेल. पण, त्यांना तिथे आयसोलेशनमध्ये रहावे लागेल. 

पीसीबीनं जाहीर केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंपैकी मोहम्मद हाफिजनं पुन्हा चाचणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं त्यानं सोशल मीडियावरून जाहीर केले. त्यानं लिहिलं की,''पीसीबीच्या अहवालानंतर मी स्वतःच्या समाधानासाठी खासगी केंद्रात चाचणी केली. माझ्या कुटुंबीयांचीही चाचणी मी करून घेतली आणि त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.''

हाफिजनं 55 कसोटीत 3652 धावा केल्या असून त्यात 10 शतकं व 12 अर्धशतकांचा समावेश आहे. 218 वन डे सामन्यांत त्यानं 11 शतकं व 38 अर्धशतकांसह 6614 धावा केल्या आहेत. ट्वेंटी-20त त्यानं 91 सामन्यांत 1992 धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही त्याच्या नावावर दोनशेहून अधिक विकेट्स आहेत. 

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान

पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन  

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापाकिस्तानइंग्लंड