इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 04:50 PM2018-12-25T16:50:12+5:302018-12-25T16:50:39+5:30

whatsapp join usJoin us
Mohammad Kaif gives it back to Imran Khan | इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

इम्रान खान यांच्या भारतविरोधी 'बोलंदाजी'वर कैफची फटकेबाजी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले.

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफने मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना खडे बोल सुनावले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्यांकांशी कसे वागावे हे शिकवणार असल्याचे वादग्रस्त विधान इम्रान खान यांनी केले होते. लाहोर येथे आयोजित एका कार्यक्रमात इम्रान खान यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल असा  पाकिस्तान घडवणार असल्याचा दावा केला होता. त्यावेळी त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. 

ते म्हणाले होते की,''अल्पसंख्यांकांशी कसे वागावे, हे आम्ही मोदी सरकारला शिकवणार आहोत. भारतात अल्पसंख्यांकांना समान नागरिकत्वाची वागणुक मिळत नाही.'' अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या देशातील झुंडशाही पाहून भीती वाटते, या विधानावर इम्रान खान यांनी हे वक्तव्य केले होते.



कैफने पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ट्विट केले की,''फाळणीत 20 टक्के अल्पसंख्यांक पाकिस्तानात गेले होते आणि आता त्यांची संख्या 2 टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. दुसरीकडे भारतातील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली आहे.'' 

समाजात विष पसरल्यानं आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असं विधान नसीरुद्दीन शहा यांनी केल होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केले. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आता गाईचा जीवन माणसापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असही ते म्हणाले होते. हा धागा धरून इम्रान यांनी मोदी सरकारवर टीका केली. 
 

Web Title: Mohammad Kaif gives it back to Imran Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.